शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

वैकुंठ स्मशानभूमी : ‘त्या’ अस्थींना प्रतीक्षा ‘मुक्ती’ची, मृत्यूपश्चातही नातेवाइकांकडून उपेक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 01:51 IST

अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही.

- लक्ष्मण मोरेपुणे - मानवी नातेसंबंध गुंतागुंतीचे आणि रागालोभाचे असतात. अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही. हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारांनंतर मृत व्यक्तीच्या अस्थी नदीमध्ये सोडणे बंधनकारक मानले गेले आहे. त्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नसल्याचे सांगितले जाते. मात्र, वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षांपासून अनेकांच्या अस्थींची गाठोडी धूळ खात पडलेली आहेत. या अस्थी अद्यापही ‘मुक्ती’च्या प्रतीक्षेत आहेत.नातेसंबंधांतील असंवेदनशीलतेचे उदाहरण समोर आले आहे. कोणत्याही जाती-धर्मामध्ये माणसाच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदाने केले जाते. आयुष्यभर जबाबदाऱ्या,नोकरी-व्यवसाय सांभाळूनसंसार आणि नात्यांची जोपासना करण्याची तारेवरची कसरत प्रत्येक व्यक्तीला करावी लागते. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक सुख-दु:खे, आयुष्यातील चढउतार, भावनिक संघर्ष करीत माणूस वार्धक्यापर्यंत येऊन पोहोचतो. वार्धक्यात नयन पैलतीराकडे लागल्यावर मात्र आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो.या काळात काही जणांच्या आयुष्यात मात्र कायमच उपेक्षा, दु:ख आणि अवहेलनेशिवाय काहीच पडत नाही. सध्या ज्येष्ठ नागरिकांच्याही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. पुण्यासारख्या शहरात एकट्या राहणाºया ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे, तर दुसरीकडे वृद्धाश्रमांचीही संख्यावाढत आहे. जमिनीला आलेले सोन्याचे भाव यामधून नात्यांमध्ये वितुष्ट येऊ लागले आहे. पारिवारिक भांडणांमधूनही अनेकांना सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत आहेत. सर्व काही नात्यांना व्यवहाराच्या तराजूमध्ये तोलण्याची मानसिकता रूढ होऊ लागली आहे.ज्यांच्या नशिबी जिवंतपणी छळ आणि अवहेलना येते, त्यांना आपण मृत्यूनंतर तरी सुटू, असे वाटत असते. मात्र, वैकुंठ स्मशानभूमीतील ‘अस्थी’ ठेवण्याची खोली समाजातील विदारक चित्र दर्शवत आहे. मानवी नात्यांमधील असंवेदनशीलता कोणत्या थराला जाऊ शकते, याचे जिवंत उदाहरणच येथे पाहायला मिळते. वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली आणि जाळ्याजळमटांमध्ये गुरफटलेली अस्थींची गाठोडी पाहताना मन हेलावून जाते. एखाद्याला जसे अज्ञातस्थळी सोडून निर्दयीपणे निघून जावे तशाच पद्धतीने या ठिकाणी अस्थी बेवारस ठेवण्यात आलेल्या आहेत. या अस्थीच आता एकमेकींच्या दु:खाच्या साक्षीदार असल्यासारख्या आहेत.अंत्यविधीनंतर रक्षा सावडण्याचा कार्यक्रम होतो. अस्थी सावडल्यानंतर त्या लाल किंवा पांढºया रंगाच्या कापडामध्ये बांधूनठेवल्या जातात.पुढील धार्मिक विधी उरकल्यानंतर या अस्थी नदीमध्ये प्रवाहित केल्या जातात. तेव्हाच मृत्यूपश्चात सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे मानले जाते.वैकुंठ स्मशानभूमीमध्येअंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांच्या अस्थी ठेवण्यासाठी एक खोली बांधण्यात आलेली आहे.या खोलीमध्ये अनेक वर्षांपासून अस्थी पडून आहेत. या अस्थी नेण्यासाठी कोणीच आलेले नाही, याचे येथील कर्मचाºयांनाही आश्चर्य वाटते.माणसे इतकी निर्दयीकशी असू शकतात आणि अस्थिविसर्जनाएवढाही वेळ आपल्याजवळ नसावा, ही शोकांतिका आहे.स्मशानभूमीतील खोलीमध्ये अस्थींचे मडके बांधलेल्या कापडाच्या अक्षरश: चिंध्या झाल्या आहेत. काही गाठोडी जमिनीवर पडलेली आहेत. वर्षानुवर्षांची धूळ त्यावर साचलेली आहे, तर खोलीमध्ये सर्वत्र जाळीजळमटे झालेली आहेत. या अस्थींना हात लावायला कोणी तयार नाही. यातील काही अस्थी चार-पाच वर्षांनंतर नातेवाईक शोधत आल्याचीही उदाहरणे आहेत. येथील अस्थींच्या गाठोड्यांवर स्केचपेनने मृताचे नाव लिहिलेले आहे. यावरून अस्थींचा शोध घेतला जातो. मात्र, असे एखाद-दुसरेच उदाहरण असेल. बहुतांश अस्थी तशाच बेवारस अवस्थेत पडलेल्या आहेत.शहरांचा झपाट्याने विकास होत असतानाच सामाजिक सुधारणाही होत आहेत. मात्र, भावना आणि असंवेदनशीलता वाढत असल्याचे यानिमित्ताने जाणवते. नात्यांसाठी समर्पित भावनेने जीवन जगणारी माणसे आणि दुसरीकडे मृत नातेवाइकाच्या अस्थी बेवारस सोडून आपल्याच आनंदात ‘स्वमग्न’ असलेली माणसे, असा विरोधाभास पाहायला मिळत आहे.स्मशानभूमीतील कर्मचारी काही वर्षांनंतर वाट पाहून स्वत:च या अस्थींचे पाण्यात विसर्जन करून टाकतात. असे करण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही; अन्यथा खोलीमध्ये अस्थी ठेवायला जागाच शिल्लक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया एका कर्मचाºयाने दिली. हा विषय भावनेचा आणि संवेदनशील आहे. मात्र, माणसे एवढी निष्ठूर कशी होऊ शकतात,असा प्रश्न त्यांनाही पडला होता.

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप