शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच

By अजित घस्ते | Updated: March 25, 2025 16:53 IST

सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध

पुणे: लांबलेला परतीचा पाऊस, अपेक्षित थंडी नसणे आणि फेब्रुवारीपासून वाढलेले तापमान या वातावरणातील बदलाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. पहिल्या बहरातील आंब्याचा मोहोर गळून पडल्याने पिकावर परिणाम झाला असून, नेहमीच्या तुलनेत उत्पादन निम्म्याने घटले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा दर कमालीचा वाढला आहे. सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात पडणार असून सामन्यांच्या आवाक्याबाहेरच आंबा गेला आहे.

आंब्यांच्या आगमनाची उत्सुकता उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वांना असते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. मार्च महिन्यात मोठी आवक होत असते. गुढी पाडव्याला आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा आंब्यांची आवक दर वर्षी मार्केटयाडर्डातील फळ बाजारात कमी प्रमाणात झाली आहे. मार्चमध्ये कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. सध्या रोज ७०० ते एक हजार पेटी आंब्याची आवक होत आहे. पुढील महिन्यात आंब्यांची आवक वाढेल, असा अंदाज आहे.असे आहेत आंब्याचे भाव

     मार्च २०२४                           मार्च २०२५८०० ते १२०० रुपये                  १५०० ते २०००

पाडव्याला आंब्याचा दर , दरवर्षीपेक्षा जास्त 

हवामान बदलामुळे उत्पादन घटल्याने सध्या आंब्यांची आवक कमी होत आहे.अनेक जण गुढी पाडव्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आंबा खरेदी करतात. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजार भाव जास्त मागील वर्षाच्या पाडव्याच्या दरम्यान असलेली आवक आणि या वर्षीची आवक यामध्ये लगबग ३० ते ४० टक्क्याने घट झाली आहे. मागील वर्षी प्रति डझन ५०० ते ७०० रुपये होता. तोच यावर्षी ऐन पाडव्याला एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपये प्रति डझन ग्राहकांना घ्यावा लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आंबा उत्पादन ३० ते ४० टक्क्याने घट आहे. मागील वर्षे आवक लगबग प्रति दिवस पाडव्याच्या वेळी चार ते पाच हजार पेटी येत होती. तीच आता प्रति दिवस एक हजारापासून ते तीन हजारापर्यंत पेटी येत आहे. कोट :

व्यापारी वर्गांना यावर्षी रत्नागिरी आंबा विकण्यास अतिशय स्पर्धात्मक कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आंबा पटवून देणे व रत्नागिरी बाजारात विकणे अतिशय कठीण जाणार आहे. सध्याचे पेटीचे बाजार ४ डझन ते ७ डझन तीन हजारापासून ते आठ हजारापर्यंत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आवक ३० टक्केनी कमी आहे. यामुळे भावात तेजीत आहेत. - युवराज काची आंबा व्यापारी मार्केटयार्ड

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाAlphonso Mangoहापूस आंबाgudhi padwaगुढीपाडवाMONEYपैसाMarket Yardमार्केट यार्डfruitsफळे