शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Ujani Dam: उजनी जलाशयाची यंदा १० दिवस अगोदरच 'पन्नाशी' पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 12:38 IST

दोन वर्षाच्या तुलनेत उजनी धरण यंदा लवकरच भरणार

कळस : पुणे नगर व सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनीने पाणीसाठ्यात यावर्षी १० दिवस अगोदरच ‘पन्नाशी’ पार केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत उजनी धरण यंदा लवकरच भरणार आहे. गतवर्षी पेक्षा यंदा १० दिवस अगोदरच उजनी पन्नास टक्के भरल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.  गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी पाणी पातळी पन्नास टक्के झाली होती. उजनी धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता.  मात्र आज १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ४९.९९ टक्के पाणी साठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पाऊस कमी जास्त असल्याने सध्या बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात घट होत आहे. बंडगार्डन येथून ११ हजार ६१ क्युसेक तर दौंड येथून २१ हजार ५२५ क्युसेक विसर्ग उजनीत मिळत आहे. सध्या उजनी धरणात ९०.४० टीएमसी पाणीसाठा असून २६.७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

दोन वर्षापूर्वी १९ जुलै २०२० रोजी उजनी उणे पातळीतून बाहेर आले होते. उजनी काही अपवाद वागळता ऑगस्ट ते सप्टेंबरअखेर पर्यंत शंभर टक्के भरत आले आहे. गेल्या दहा दिवसांत उजनीत ५९ टक्के पाणीपातळी वाढली आहे. गतवर्षी उजनीचा पाणलोट क्षेत्रात ६४६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी दीड महिन्यात २६७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे ५०० ते ६०० मिली मीटर पाऊस उजनी पाणलोट क्षेत्रात होतो शेती, पाणीपुरवठा योजना, औद्योगिक क्षेत्र व अनेक शहराचा पाणीपुरवठा तसेच औद्योगिक वसाहती उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उजनी मध्ये येणारा पाण्याचा विसर्ग कमी असला तरी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी आपले विद्युत पंप, गाळपिक द्वारे केलेली कडवळ, मका पिके काढत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊस