शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

... हे अजितदादांचे दुर्दैव : चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 18:03 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोला...

बारामती (पुणे) : अजित दादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये दाखवली आहे. त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे हे दुर्दैव आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.

शनिवारी (दि. २४) कार्यक्रमानिमित्त बारामती येथे आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीमधील नाट्यमय घडामोडीनंतर मला असे वाटले होते की अजित पवार व छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडतील. मात्र त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. राष्ट्रवादीमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्या केवळ मीडियाची स्पेस घेण्यासाठी व महाराष्ट्राला भूलथापा देण्यासाठी आहे. त्यामुळे तिथे भाकरी फिरवण्याची कोणालाही इच्छा नाही.

उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे. तुम्ही विधान मंडळाचे सदस्य आहात. विधान मंडळामध्ये तुम्ही पीएम केअर फंडाबाबत आवाज उठवावा. मागील अधिवेशनामध्ये तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही एकच दिवस अधिवेशनामध्ये आला. तुम्हाला ठाणे नागपूर येथील महापौरांचा भ्रष्टाचार माहिती आहे. तर अधिवेशनामध्ये येऊन तुम्ही ते मांडायला हवे होते. सरकार त्याची चौकशी करेल. मात्र तुम्ही अधिवेशनामध्ये येणारच नाही. तुमच्या लेटर पॅड वर हे सरकारला सांगा ना, का नुसत्या तोंडाच्या वाफा फेकायच्या. तुमच्यात जर हिम्मत असेल तर विरोधी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही हा भ्रष्टाचार समोर मांडा. जर काही चुकीचे असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

पंकजाताईंच्या रक्ता-रक्तामध्ये फक्त कमळ...

पंकजाताई या गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीमध्ये वाढल्या आहेत. त्यांच्या रक्तारक्तामध्ये कमळ आहे. त्या कधीही बीआरएस किंवा एमआयएम या पक्षांचा विचार देखील करू शकत नाहीत. हा महाराष्ट्र समजायला भाजपला चाळीस वर्षे लागली. पवार साहेबांना 84 वर्षे लागली. त्यामुळे बाहेरचा कोणीतरी येईल आणि मी हे करेल ते करेल असे सांगेल तर ते होणार नाही. कोणी बीआरएस आणि एमआयएम पंकजाताई यांच्याकडे  जात असेल तर त्या दारात देखील उभे करणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

वैयक्तिक टीका करणार असाल तर आम्हाला निर्णय करावा लागेल...ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. आदित्य हे सरकारमध्ये मंत्री होते विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यावर टीका करणे गरजेचे होते. विरोधी पक्षांची टीका झेलण्याची तुमच्या क्षमता असायला हवी. आम्ही त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली मात्र परिवारावर कधीही टीका केली नाही. परिवारावर टीका करायची असेल तर त्यांच्या एक हजार गोष्टी आमच्याकडे आहेत. ते देवेंद्र फडणवीस वर अशा पद्धतीने टीका करत असतील तर त्यांच्या बाबतीत आम्हाला निर्णय करावा लागेल आणि आम्ही तो लवकर करू.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेPraful Patelप्रफुल्ल पटेलUddhav Thackerayउद्धव ठाकरे