शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 21:19 IST

पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत पाठलाग करुन चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने आरोपींना चोरीला गेलेल्या रोकडसह पकडले...

बारामती : एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी चालविलेली ४३ लाखांची रोकड भर दिवसा पळविल्याची घटना सोमेश्वरनगर — बारामती रस्त्यावर घडली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत पाठलाग करुन चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने आरोपींना चोरीला गेलेल्या रोकडसह पकडले. यावेळी रस्त्यावर पाठलागाचा थरार अनेकांनी अनुभवला. या प्रकरणी पोलीसांनी पाचजणांना पकडले आहे. अवघ्या दिड तासात पोलीसांनी भर दिवसा झालेली लाखोंची चोरी उघड केली. याबाबत पोलीस उपअधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. त्यानुसार घटना घडल्यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात याबाबत सुधीर भिसे (वय २७, रा. सदोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) आणि अन्य दोघा जणांनी पोलीस ठाण्यात येऊन कळविले. त्यानुसार  भिसे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी  शनिवार (दि.३0) सोमेश्वर येथे बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये दुपारी ३ च्या सुमारास पैसे भरले.त्यानंतर ते  सोमेश्वर ते बारामती रस्त्याने अल्टो कार (क्र. एमएच १२ एफएफ ४४८३) मधून पुढील कामासाठी निघाले.याचवेळी  मार्गस्थ होताना  आठफाटा होळ (ता. बारामती) येथे लाल रंगाची व एक काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सरवर आलेले  दोन अज्ञात युवक  कारच्या समोर आडवी आले. त्यामुळे कार थांबविण्यात आली.तसेच, याचवेळी कारच्या पाठीमागे एक पल्सर उभी केली. त्यावरील युवकांनी चाकुचा धाक दाखवत कारमधील बसलेल्या भिसे आणि त्यांच्या सहकाºयांच्या  ताब्यातील एटीएममध्ये पैसे भरणा करीत असलेली रक्कम ४३ लाख रुपये ठेवलेली बॅग तसेच कागदपत्रांच्या दोन बॅगा घेऊन वडगाव निंबाळकर दिशेने पळ काढला.तसेच आरोपींचे वर्णन सांगितले.त्यानंतर पोलीसांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखुन तात्काळ या वाहनांची माहिती वरिष्ठ अधिकारी व पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना तत्काळ दिली. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या सर्व ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण यांना कळवून आजूबाजूचे पोलीस स्टेशन हद्दीतील तात्काळ नाकाबंदी नेमणेबाबत कळविले.त्यावरुन मौजे खंड्खैरेवाडी (ता.बारामती जि.पणे )येथील पोलीस पाटील रुपाली जगताप व त्यांचे पती विजय जगताप यांचेकडुन महत्वाची माहिती मिळाली.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ,वर्णनाप्रमाणे एका पल्सर वर दोन युवक भोंडवेवाडी कडून मांगोबाचीवाडी दिशेने वेगात निघून गेले होते. त्यांचे हालचाली संशयास्पद असलेबाबत पोलीसांना माहिती मिळाली. त्यावरुन तातडीने  सुपा दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेले व बोरकरवाडी-वढाणे फाटा येथे नाकाबंदीला उपस्थित असणारे पोलीस कॉन्स्टेबल  विशाल नगरे यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग सुरु केला.तसेच धाडसाने  पल्सर वरील दोन आरोपी गुन्हयातील चोरी झालेल्या  रक्कमेसह ताब्यात घेतले. तसेच उर्वरीत दोन आरोपी जेजुरी-मोरगाव रोडवरील लपुन बसले बाबत माहीती पोलीसांना मिळाली.त्यांचा देखील ठाणेकरमळा मोरगाव दिशेने शेतातुन पळुन जात असताना पोलीसांनी  पाठलाग सुरु केला.तसेच शिताफीने दोन्ही आरोपींचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.  उर्वरील एक आरोपी ढाकाळे- पणदरे या मार्गावर  एका पल्सर वरुन पळुन जात असताना पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस कॉन्स्टेबल  हिरालाल खोमणे यांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.पकडलेल्या आरोपीची नावे  निलेश बापु जाधव, राज विनोद मलीक, कुमार लक्ष्मण शिंदे ,निशांत विजय पवार ,गणेश ज्ञानदेव शेंडगे (सर्व रा रविवार पेठ फलटण ता फलटण जि सातारा) अशी आहेत.रात्री उशीरा प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.कलम ३९५,३४१ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपींच्या दुचाकीच्या सीटखाली पोलीसांना चाकु सापडला आहे.दरम्यान, पोलीस अधिक्षक संदीप पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक  मिना,उपविभागीय पोलीस अधिकारी   शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक कवितके, पोलीस साळुंंके, सहायक  फौजदार शरद वेताळ, पोपट  जाधव ,रविंद्र  पाटमास, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब  पानसरे , विठ्ठल कदम, विशाल नगरे, सलमान खान, ज्ञानेश्वर सानप, अमोल भूजबळ, मारकड, हिरालाल खोमणे ,भाऊसाहेब शेडगे,संजय  मोहीते,प्रदीप काळे  यांनी ही महत्वाची कामगिरी केली.                     

टॅग्स :PuneपुणेatmएटीएमPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक