‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 09:19 PM2019-11-30T21:19:07+5:302019-11-30T21:19:19+5:30

पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत पाठलाग करुन चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने आरोपींना चोरीला गेलेल्या रोकडसह पकडले...

Thirty-five-year-old burglars arrested for paying 'ATM' | ‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद 

‘एटीएम’ भरण्याची ४३ लाखांची रोकड पळविणारे चोरटे दीड तासात जेरबंद 

Next

बारामती : एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी चालविलेली ४३ लाखांची रोकड भर दिवसा पळविल्याची घटना सोमेश्वरनगर — बारामती रस्त्यावर घडली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत पाठलाग करुन चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने आरोपींना चोरीला गेलेल्या रोकडसह पकडले. यावेळी रस्त्यावर पाठलागाचा थरार अनेकांनी अनुभवला. या प्रकरणी पोलीसांनी पाचजणांना पकडले आहे. अवघ्या दिड तासात पोलीसांनी भर दिवसा झालेली लाखोंची चोरी उघड केली.
 याबाबत पोलीस उपअधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. त्यानुसार घटना घडल्यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात याबाबत सुधीर भिसे (वय २७, रा. सदोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) आणि अन्य दोघा जणांनी पोलीस ठाण्यात येऊन कळविले. 
त्यानुसार  भिसे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी  शनिवार (दि.३0) सोमेश्वर येथे बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये दुपारी ३ च्या सुमारास पैसे भरले.त्यानंतर ते  सोमेश्वर ते बारामती रस्त्याने अल्टो कार (क्र. एमएच १२ एफएफ ४४८३) मधून पुढील कामासाठी निघाले.याचवेळी  मार्गस्थ होताना  आठफाटा होळ (ता. बारामती) येथे लाल रंगाची व एक काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सरवर आलेले  दोन अज्ञात युवक  कारच्या समोर आडवी आले. त्यामुळे कार थांबविण्यात आली.तसेच, याचवेळी कारच्या पाठीमागे एक पल्सर उभी केली. त्यावरील युवकांनी चाकुचा धाक दाखवत कारमधील बसलेल्या भिसे आणि त्यांच्या सहकाºयांच्या  ताब्यातील एटीएममध्ये पैसे भरणा करीत असलेली रक्कम ४३ लाख रुपये ठेवलेली बॅग तसेच कागदपत्रांच्या दोन बॅगा घेऊन वडगाव निंबाळकर दिशेने पळ काढला.तसेच आरोपींचे वर्णन सांगितले.
त्यानंतर पोलीसांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखुन तात्काळ या वाहनांची माहिती वरिष्ठ अधिकारी व पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना तत्काळ दिली. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या सर्व ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण यांना कळवून आजूबाजूचे पोलीस स्टेशन हद्दीतील तात्काळ नाकाबंदी नेमणेबाबत कळविले.त्यावरुन मौजे खंड्खैरेवाडी (ता.बारामती जि.पणे )येथील पोलीस पाटील रुपाली जगताप व त्यांचे पती विजय जगताप यांचेकडुन महत्वाची माहिती मिळाली.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ,वर्णनाप्रमाणे एका पल्सर वर दोन युवक भोंडवेवाडी कडून मांगोबाचीवाडी दिशेने वेगात निघून गेले होते. त्यांचे हालचाली संशयास्पद असलेबाबत पोलीसांना माहिती मिळाली. त्यावरुन तातडीने  सुपा दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेले व बोरकरवाडी-वढाणे फाटा येथे नाकाबंदीला उपस्थित असणारे पोलीस कॉन्स्टेबल  विशाल नगरे यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग सुरु केला.तसेच धाडसाने  पल्सर वरील दोन आरोपी गुन्हयातील चोरी झालेल्या  रक्कमेसह ताब्यात घेतले. तसेच उर्वरीत दोन आरोपी जेजुरी-मोरगाव रोडवरील लपुन बसले बाबत माहीती पोलीसांना मिळाली.त्यांचा देखील ठाणेकरमळा मोरगाव दिशेने शेतातुन पळुन जात असताना पोलीसांनी  पाठलाग सुरु केला.तसेच शिताफीने दोन्ही आरोपींचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.  उर्वरील एक आरोपी ढाकाळे- पणदरे या मार्गावर  एका पल्सर वरुन पळुन जात असताना पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस कॉन्स्टेबल  हिरालाल खोमणे यांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.पकडलेल्या आरोपीची नावे  निलेश बापु जाधव, राज विनोद मलीक, कुमार लक्ष्मण शिंदे ,निशांत विजय पवार ,गणेश ज्ञानदेव शेंडगे (सर्व रा रविवार पेठ फलटण ता फलटण जि सातारा) अशी आहेत.रात्री उशीरा प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.कलम ३९५,३४१ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपींच्या दुचाकीच्या सीटखाली पोलीसांना चाकु सापडला आहे.
दरम्यान, पोलीस अधिक्षक संदीप पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक  मिना,उपविभागीय पोलीस अधिकारी   शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक कवितके, पोलीस साळुंंके, सहायक  फौजदार शरद वेताळ, पोपट  जाधव ,रविंद्र  पाटमास, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब  पानसरे , विठ्ठल कदम, विशाल नगरे, सलमान खान, ज्ञानेश्वर सानप, अमोल भूजबळ, मारकड, हिरालाल खोमणे ,भाऊसाहेब शेडगे,संजय  मोहीते,प्रदीप काळे  यांनी ही महत्वाची कामगिरी केली. 
                    

Web Title: Thirty-five-year-old burglars arrested for paying 'ATM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.