अकरावी प्रवेशाची आजपासून तिसरी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:11 IST2018-07-23T00:10:43+5:302018-07-23T00:11:32+5:30
आज सकाळी अकरा वाजता महाविद्यालयातील रिक्त जागा व दुस-या यादीतील कटआॅफ संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत.

अकरावी प्रवेशाची आजपासून तिसरी फेरी
पुणे : केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीला आजपासून (सोमवार, दि. २३ जुलै) सुरुवात होत आहे. आज सकाळी अकरा वाजता महाविद्यालयातील रिक्त जागा व दुसºया यादीतील कटआॅफ संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना २३ व २४ जुलै रोजी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलता येतील किंवा नव्याने एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांनाही अर्ज भरता येईल.
तिसºया फेरीची गुणवत्ता यादी २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २६ ते २८ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. चौथ्या फेरीला ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे तसेच २ आॅगस्ट रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. अकरावी प्रवेशाच्या दुसºया फेरीमध्ये १० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या व दुसºया फेरीत मिळून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ हजार ८८० इतकी झाली आहे.