जेजुरीला दर्शनाला गेलेल्या तरुणांना चोरट्यांनी दिवे घाटात लुटले, मध्यरात्रीची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:28 IST2024-04-24T11:27:36+5:302024-04-24T11:28:06+5:30
याबाबत तरुणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.....

जेजुरीला दर्शनाला गेलेल्या तरुणांना चोरट्यांनी दिवे घाटात लुटले, मध्यरात्रीची घटना
पुणे : दिवे घाटात चोरट्यांनी दोन तरुणांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल संच चोरून नेला. याबाबत तरुणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसर भागात राहायला आहेत. दोघेजण दुचाकीवरून जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते.
दोन दिवसांपूर्वी ते मध्यरात्री दोनच्या सुमारास हडपसरकडे येत असताना घाटातील वळणावर चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून मोबाइल संच चोरून दुचाकीवरून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.