शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

खिडकीतून शिरुन चोऱ्या करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:39 IST

मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

ठळक मुद्देदीड लाखांचा ऐवज केला जप्त : युनिट चारच्या पथकाकडून कारवाई

पुणे : चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साह्याने चोरी करणाºया सराईतास अखेर अटक केली. युनिट चारच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळत लँपटॉप, मोबाईल, दागिने असा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. चंद्रकांत बापू साळवे (वय २९, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. पहिल्या तक्रारीत वॉचमनचे काम करणा-याच्या मुलीचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्याने मुलीच्या शिक्षणासाठी लॅपटॉप हफ्त्याने खरेदी केला होता. लॅपटॉपचे दोनच हप्ते भरलेले असताना तो चोरीला गेला. यामुळे त्यांच्या मुलीच्या शिक्षणात मोठा व्यत्यय आला होता. तर दुसरा तक्रारदार हा आयटी कंपनीत डेटा बेस अ?ॅडमीन म्हणून काम करत आहे. त्याने लॅपटॉवर रात्रभर जागून अतिमहत्वाचा प्रोजेक्ट पुर्ण केला होता. त्याला तो दुसºया दिवशी कंपनीत सादर करायचा होता. मात्र त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणि सोने चोरण्यात आले. चंदननगर पोलीस ठाण्यात दोन्ही तक्रारी दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक समांतर तपास करत होते. तपास करताना पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद व सचिन ढवळे यांना सराईत गुन्हेगार चंद्रकांत साळवे अशा प्रकारच्या चो-या करत असल्याची माहिती मिळाली. तो चंदननगर येथे पाण्याच्या टाकीजवळ लॅपटॉप विकायला येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आणखी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईलही हस्तगत केला गेला. त्याच्यावर यापूर्वी विमाननगर, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद, सचिन ढवळे, शंकर पाटील, गणेश साळुंके, राजू मचे, भालचंद्र बोरकर, हनुमंत बोराटे, रमेश सावळे, अतुल मेंगे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक