शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माजी पोलीस महासंचालकांच्या घरी चोरी करणार्‍या चोरट्यांना हरियाणातून केले जेरबंद; सराफासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:28 IST

१ कोटी ३४ लाख ९५ हजार ६४१ रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती. 

पुणे : उंड्री येथील न्याती विंड चेंइम्स सोसायटीतील माजी पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्यासह दोन घरात घरफोडी करुन तब्बल १ कोटी ३४ लाखांचा ऐवज लंपास करणार्‍या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी हरियानाहून जेरबंद केले आहे. त्यांच्याबरोबरच चोरीचे दागिने विकत घेणार्‍या सराफालाही अटक करण्यात आली आहे.

राजेशकुमार माहेनलाल सरोज (वय ३३), राकेशकुमार मोहनलाल सरोज (वय ३०, दोघे रा. नवी दिल्ली) आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार (वय ३०, रा. राजसंमद, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

कोंढवा पोलिसांनी या अगोदर मनिषकुमार ऊर्फ सौरभ मदनलाल सरोज (वय १९, रा. वसई, ठाणे) याला अटक केली होती. राजेशकुमार, राकेशकुमार आणि मनिषकुमार हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राहणारे आहेत. 

या तिघांनी मिळून २३ व २४ ऑगस्ट २०२० च्या दरम्यानच्या रात्री न्याती विंडचेंइम्स सोसायटीत शिरुन राज खिलनानी व नैला रिझवी यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला व दोन्ही घरातील मिळून १ कोटी ३४ लाख ९५ हजार ६४१ रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती. 

सीसीटीव्हीवरुन कोंढवा पोलिसांनी या तिघांपैकी मनिषकुमार याला अटक केली होती. पण, त्याच्याकडे चोरीचा माल मिळाला नाही. त्याचवेळी त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना पोलिसांना या चोरट्यांविषयी माहिती कळविली होती. दरम्यान, हरियाना पोलिसांनी राजेशकुमार आणि राकेशकुमार यांना पकडल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक तातडीने हरियानाला रवाना झाले. त्यांनी दोघांना हरियाना पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दागिने मदनलाल कुम्हार या सराफाला विकल्याची माहिती दिली. सराफाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून ८ लाख १० हजार रुपयांची १८० ग्रॅमची सोन्याची लगड तसेच ९० हजार रुपयांची २१ ग्रॅमची लगड जप्त केली आहे. मनिषकुमार याने चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेला ११ हजार रुपयांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली कार व घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यामार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकHaryanaहरयाणा