शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'FTII'मध्ये चोऱ्या करणाऱ्याला अटक; साफसफाई करताना दाखवली 'हात की सफाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 14:44 IST

एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न...

पुणे : सुरक्षा रक्षक असलेल्या एफटीआयआय या सुरक्षा रक्षक असलेल्या संस्थेतील पार्किंगमधील दुचाकी गाड्यांच्या बॅटर्यासह अनेक साहित्य चोरीला गेले होते. या चोरीचा तपास डेक्कन पोलिसांनी अल्पावधीत लावून चोरीच्या मालासह टेम्पो जप्त केला आहे. राहुल राम भांडवे (वय ३२, रा. दत्तवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.        याप्रकरणी भगवान गणपती शेकापूरे (वय ५७, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. एफ टीआय येथे एकूण ५२ सुरक्षारक्षक असून त्यांचे तीन शिफ्टमध्ये काम चालते. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी आवाराची पाहणी केली असता विद्यार्थी वसतीगृह येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क केलेल्या १० दुचाकी वाहनांंच्या बॅटर्या चोरीस गेल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणी असलेले लोखंडी खिडक्यांचे ग्रील, पाईप, लोखंडी बॉक्स, ट्युबलाईट कव्हर असा सर्व मिळून १८ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

त्याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती मिळाली की, एका तीन चाकी टेम्पोतून चोरीचा माल विक्रीसाठी जात आहे. त्यानुसार त्यांनी म्हात्रे पुलाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो येताना दिसला. त्याला काही अंतरावर टेम्पोला पोलिसांनी थांबविले. टेम्पोमधील मालाची तपासणी केली असता एफटीआयमध्ये चोरलेला माल त्यात दिसून आला. पोलिसांनी हा १८ हजार ५०० रुपयांचा चोरीचा माल आणि तो वाहून नेत असलेला २ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला आहे.

राहुल भांडवे याने एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न् झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, उपनिरीक्षक किशाेर शिंदे, हवालदार संजय शिंदे, कापरे, तरंगे, गोरे यांनी हा तपास केला.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयThiefचोरtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस