रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:01+5:302021-02-05T05:14:01+5:30
पुणे : प्रवाशांच्या ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. योेगेश रमेश माने (वय २६, ...

रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटा अटकेत
पुणे : प्रवाशांच्या ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
योेगेश रमेश माने (वय २६, रा. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जबलपूर-पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची किमती ऐवज असलेली बॅग केडगाव ते यवत रेल्वे स्टेशन दरम्यान चोरट्यांनी लंपास केली होती. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी केल्यावर ही चोरी माने याने केल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक सदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.