शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 23:53 IST

डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते...

ठळक मुद्देदेहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रावेत पोलीस चौकीत अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल

पिंपरी : हॅण्डग्लोव्हज, मास्कसह डॉक्टरांसारखा पेहराव करून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एक किराणा दुकान व तीन मेडिकल स्टोअर्स फोडले. चिल्लरसह १४ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. रावेत येथील शिंदे वस्ती येथे शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रावेत पोलीस चौकीत अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सचिन शशिकांत जरकर (वय ४०, रा. भोंडवे एम्पायर, शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिंदे वस्ती येथे किराणा दुकान आहे. गुरुवारी दुकान बंद करून ते घरी गेले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे दुकानासमोर आले. दोन्ही आरोपी यांनी तोंडाला मास्क लावला होता. तसेच हॅण्डग्लोव्हज देखील घातले होते. त्याचप्रमाणे डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते. त्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. काऊंटरच्या ड्रॉपमधून चिल्लर तसेच रोकड लंपास केली. तसेच इतर तीन औषध विक्रीच्या दुकानांचे देखील शटर उचकटून तेथे चोरी केली. मात्र या दुकानांत मोठी रक्कम नव्हती. फिर्यादी यांना शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार दिसून आला. त्यांनी पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर रावेत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. मात्र चोरट्यांनी डॉक्टरांसारखा पेहराव केल्याने त्यांचे चेहरे फुटेजमध्ये दिसत नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन, जमावबंदी व वाहनबंदी आहे. त्यामुळे रस्ते ओस पडले असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. असे असतानाही चार दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThiefचोरdoctorडॉक्टरtheftचोरीPoliceपोलिस