राजगुरुनगर : कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहन चालकाला कोयत्याचा धाक दाखवून बांधून ठेवत चोरट्यांनी कोंबडयासह टेम्पो पळविला. अंदाजे ४ लाख रुपयांच्या कोंबडया या टेम्पोत होत्या. चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला.याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर तालुक्यतील म्हाळुगे येथील सिद्धिविनायक पोल्ट्री फार्ममधुन टेम्पोमध्ये (एमएच- ०४ जीएफ. ९५६२) या १४९७ बॉयलर कोंबडया भरल्या होत्या. मात्र, मुंबई येथे जात असताना रात्री १ वाजता पुणे -नाशिक महामार्गावर शिरोली (ता खेड ) येथे टेम्पोला मोटार सायकल आडवी लावून दबा धरुन बसलेल्या ६ अज्ञात चोरट्यांनी मुंबई मधील वडाळा येथील अक्रम मुसलीम खान (वय.२८ ), अब्दुलगणी अब्दुल (वय.२९,) टिपूसुलतान बाबासाहब शेख (वय ४५ ) यांना कोयता व चाकुचा धाक दाखवून अंधारात झाडांमध्ये बसविले. त्यांचे मोबाईल काढून घेतले. दरम्यान ३ चोरटे त्यांच्याबरोबर थांबले. इतर चोरट्यांनी कोंबड्यांसह टेम्पो पळवुन नेला. सुमारे ४ तासांनी टेम्पोमधील कोंबड्यांची चोरी करून रिकामा टेम्पो आणुन दिला. तसेच त्यानंतर चोरट्यांनी वाहन चालकाला आणि त्याच्या साथीदाराला आम्ही गेल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने येथून जायचं असा दम भरला....
कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 19:26 IST