शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 17:03 IST

पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे.

पुणे : खडकवासला धरण परिसरातील चौपाटीवर वारंवार  होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दर रविवारी  खाद्य पदार्थांचा गाडा आणि पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला असून आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

ऐतिहासिक सिंहगड किल्ला, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांचा परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत वाहतुकीचा फज्जा उडतो. खडकवासला धरण चौपाटीवर अरुंद रस्ता आणि त्यावर केल्या जाणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी हमखास होते. ग्रामीण पोलीस दलाचे तीस ते चाळीस कर्मचारी शनिवार आणि रविवार या परिसरात असतात. परंतु अरूंद रस्त्यामुळे कोंडी नियंत्रणाबाहेर असते. त्यामुळे आजपासून या परिसरात खाद्य पदार्थांचा गाडा आणि पार्किंग साठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविषयी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले की, खडकवासला धरण परिसरातील  चौपाटीवर  सिंहगड रस्ता अरूंद असून शनिवार आणि रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. पार्किंग साठी चौपाटीवर जागा नसल्यामुळे पर्यटक अरूंद रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. या दिवसात साधारण वीस ते तीस हजार पर्यटकांचा असतो. तसेच धरणाच्या वर असणाऱ्या गावकऱ्यांना येथील वाहतूक कोंडीचा त्रास होतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणParkingपार्किंगTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस