शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:16 IST

स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

पुणे: महापालिका निवडणुकीत तब्बल ११९ जागा मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. आता स्वीकृत नगरसेवकांबाबत ज्यांना आताच्या निवडणुकीत संधी मिळाली नाही. त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते.  शिंदेसेनेला काही संधी देणार आहे का? या स्वीकृत नगरसेवकाच्या प्रश्नावर मोहोळ म्हणाले,  महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती, त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

शहर फ्लेक्समुक्त करण्याचा शब्द आम्ही महापालिका निवडणुकीत पुणेकरांना दिला. मात्र, त्यानंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांचे शहरात अनधिकृत फ्लेक्स उभे राहिले आहेत. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. त्यामुळे शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच विद्रुपीकरण थांबवण्यासाठी फ्लेक्समुक्त पुण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, भाजपच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फ्लेक्स शहरभर लागले आहेत. यावरून विरोधकांकडून आणि नागरिकांकडून भाजपच्या कथणी आणि करणी यात फरक असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे सांगितले. शहरातील फ्लेक्स किती दिवसांत काढले जातील? या प्रश्नावर मात्र स्पष्ट उत्तर देणे मोहोळ यांनी टाळले.

मोहोळ म्हणाले, आमच्याकडे पुणे महापालिकेसाठी व्हिजन आहे, ते पूर्ण करण्यासह समान पाणीपुरवठा योजना, जायका, नदीकाठ सुशोभीकरण आणि वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य राहील. महापालिकेतील महत्त्वाची पदे मुख्य शहरातील नगरसेवकांना दिल्यास समाविष्ट गावे व उपनगरातील कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, या प्रश्नावर मोहोळ म्हणाले, विकास तेथील लोकप्रतिनिधींना पदे दिली तर होतो, असे काही नाही. सर्वांगीण विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम केले जाणार आहे, त्यामुळे समाविष्ट गावांचाही विकास होईल. 

महाराष्ट्र सहकाराची पंढरी

देशात सहकाराच्या सव्वाआठ लाख संस्था आहेत. त्यातील अडीच लाख संस्था या केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पूर्वी सहकारी संस्था मी आणि माझे कुटुंब यापुरत्याच मर्यादित होत्या. केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. मागील दीड वर्षात सहकार क्षेत्रात काम करत असताना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १० हजार कोटींची मदत केली आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक १४ विमानतळ

हवाई वाहतुकीत मोठे काम झाले आहे. लोहगाव विमानतळाचा विस्तार झाला. सेवा सुविधा वाढवण्यात आली. राज्यात १४ विमानतळे झाली आहेत. देशात सर्वाधिक विमानतळे महाराष्ट्रात आहेत. डोमेस्टिक वाहतुकीत आपण दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : No alliance before election; no question of corporator post: Mohol

Web Summary : Murlidhar Mohol clarified that since there was no pre-election alliance with Shinde's Sena, there is no question of offering them a corporator post. Priority will be given to completing projects like water supply and river beautification. Focus on removing illegal flex banners in Pune and developing all areas.
टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळBJPभाजपाMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती