नाेटबंदीनंतरची तीन वर्षे मंदीचीच ; व्यावसायिकांच्या प्रतिक्रीया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 20:37 IST2019-11-08T20:35:46+5:302019-11-08T20:37:21+5:30
नाेटबंदीनंतरच्या तीन वर्षात व्यवासायिकांवर काय परिणाम झाला याचा घेतलेला आढावा.

नाेटबंदीनंतरची तीन वर्षे मंदीचीच ; व्यावसायिकांच्या प्रतिक्रीया
पुणे : नाेटबंदीकरुन आज तीन वर्षे झाली. 8 नाेव्हेंबर 2016 राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला संबाेधित करत नाेटबंदीची घाेषणा केली हाेती. देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचार थांबावा आणि दहशतवाद्यांचे कंबरडे माेडावे यासाठी ही नाेटबंदी केल्याचे माेदी म्हणाले हाेते. अचानक करण्यात आलेल्या नाेटबंदीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. असंघटित क्षेत्राला या नाेटबंदीचा माेठा फटका बसला हाेता. नाेटबंदीच्या तीन वर्षपूर्तीनंतर व्यावसायिकांना काय वाटतं त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाेटबंदीनंतरची तीन वर्षे ही मंदितच गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली.
बॅगचे व्यावसायिक असलेले गजानन फडतरे म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवसायात माेठी घट झाली. तीन वर्षात ती सावरली नाही. नाेटबंदीच्या आधी व्यवसाय व्यवस्थित सुरु हाेता. नाेटबंदीनंतर जी मंदी आली ती अद्यापही सुरुच आहे. 50 टक्क्याहून अधिक व्यवसाय कमी झाला आहे. कॅशचे व्यवहार माेठ्याप्रमाणावर कमी झाले आहेत. तरुण विविध ऑनलाईन पद्धतीने पैसे देतात. परंतु त्याबद्दल फारशी माहिती नसल्याने ती अॅप वापरण्यात अडचणी येतात.
कपड्यांचे व्यावसायिक कृपालसिंह हुडा म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवसाय हळूहळू कमी हाेत चालला आहे. लाेक विचार करुन खरेदी करत आहेत. नाेटबंदीनंतर आम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील सुरु केली. परंतु तरी देखील ग्राहकांची संख्या माेठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. नाेटबंदीच्या आधीचे चित्र वेगळे हाेते. त्यावेळी व्यवासाय सुस्थितीत चालत हाेता. नवीन ऑनलाईन खरेदी वेबसाईटमुळे देखील माेठा ताेटा सहन करावा लागत आहे. नाेटबंदीनंतर अनेकांना आपली दुकाने बंद करावी लागली.
नाेटबंदीनंतर कॅश व्यवहारावर माेठा परिणाम झाला. कॅश व्यवहार माेठ्याप्रमाणावर कमी झाला आहे. लाेक ऑनलाईन अॅप वापरुन अनेक ग्राहक पैसे देतात, परंतु ते बॅंकेच्या खात्यावर जात असल्याने आम्हाला दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयाेग करता येत नाही. बॅकेच्या अकाऊंटवर पैसे दिसतात परंतु ते तात्काळ काढता येत नाहीत. नाेटबंदीनंतर व्यवासाय 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाला. नाेटबंदीच्या आधी लाेक सर्व व्यवहार कॅशमध्ये करायचे. नाेटबंदीनंतर कॅश व्यवहारातून कमी झाल्याने आता अनेक अडचणी येत आहेत. सराकरने व्यवहारात चलन वाढवायला हवे. नाेटबंदीनंतर घरची आर्थिक घटी सुद्धा विस्कटली आहे. अशी प्रतिक्रीया कपड्याचे छाेटे दुकान असणाऱ्या राजेश यांनी व्यक्त केली.
हमाल असलेले गजेंद्र साेनवणे म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवहारातून नाेटा बाद झाल्याने त्याचा व्यापाऱ्याच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला काम मिळणे अवघड झाले. आधी सारखे चलन सहज उपलब्ध हाेत नाही. नाेटबंदीच्या आधी परिस्थिती चांगली हाेती परंतु नाेटबंदीनंतर ती बिकट झाली आहे. अजूनही काम मिळणे अवघड जात आहे.