यशाला शॉर्टकट नसतोच
By Admin | Updated: January 25, 2017 02:12 IST2017-01-25T02:12:05+5:302017-01-25T02:12:05+5:30
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, त्याकरिता मेहनत करणे गरजेचे असते. शॉर्टकटने मिळालेल्या यशाने तुम्ही जितके लवकर वरती

यशाला शॉर्टकट नसतोच
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, त्याकरिता मेहनत करणे गरजेचे असते. शॉर्टकटने मिळालेल्या यशाने तुम्ही जितके लवकर वरती जाता तितक्याच लवकर तुम्ही खालीदेखील येता. ‘थ्री इडिएयट्’मध्ये आमिर खानने म्हणाल्याप्रमाणे ‘सक्सेस के पिछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पिछे आऐगी’ हा संदेश आहे, सुप्रसिद्ध तबलावादक तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्यांच्याशी साधलेला संवाद..
४तुमच्यावर वादनाचे संस्कार कसे झाले?
४तबलावादनाची परंपरा असलेल्या घराण्यात माझा जन्म झाला. माझे वडील उस्ताद अल्ला रख्खासाहेब हे तबलावादक होते. मोठे बंधू झाकीर हुसेन यांना लहानपणापासून तबलावादन करताना पाहात आलो आहे. त्यामुळे मलाही तबलावादनाची आवड निर्माण झाली.
४डिझेंबे, बोंगो, डफ या वाद्यांकडे कसे वळलात?
- तबलावादन करत असताना एका क्षणी मला असे वाटले, की तबला वादनापुरते मर्यादित न राहता आणखी नवीन काही शिकायला हवे. अब्बाजी नेहमी म्हणत, संगीताकडे डोळ्यावर झापड लावून पाहू नये. संगीत सर्वत्र आहे. यातूनच मी इतर वाद्यांकडे वळालो.
४उस्ताद अल्ला रख्खासाहेब व झाकीर हुसेन यांच्याबद्दल काय सांगाल?
- मी स्वत:ला भाग्यवान समजतो. वादनाची मोठी परंपरा असलेल्या घराण्यात माझा जन्म झाला. अनेकांचे स्वप्न असते अशा दिग्गजांबरोबर काम करण्याचे. परंतु मी मात्र त्यांना पाहतच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे माझ्या वादनामध्ये त्यांची छबी दिसून येते.
४अल्ला रख्खासाहेब हे गुरू व वडील. तुम्हाला त्यांची कोणती भूमिका अधिक भावली?
- अब्बाजी हे शिष्य व त्यांची मुले यांच्यामध्ये कधीच फरक करत नसत. ते वडिलांच्या भूमिकेत असताना आमचे फार लाड करत. पण शिक्षकांच्या भूमिकेत असताना ते तितकेच शिस्तप्रिय होते. अब्बाजी नेहमी आम्हाला त्यांच्या कार्यक्रमांना सोबत घेऊन जात. तेव्हा ते सांगायचे, कार्यक्रम पाहणे हादेखील एक अनुभव आहे. यातून तुम्हाला प्रेक्षकांची ओळख होते. त्यांच्याशी संवाद साधता येतो. रसिक व कलाकार यांच्यातील जुगलबंदी अनुभवता येते.
४त्यांची कोणती गोष्ट कायम स्मरणात आहे.
- वडिलांसबोत रियाज करताना ते वही व पेन घेऊन बसत असे. त्या वेळी ते म्हणत मंचावर कार्यक्रम सादर करताना तुम्ही वही आणि पेन घेऊन बसणार आहात का? जे काही असेल ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आता ही शिकवण फार उपयोगी पडत आहे. कारण आताच्या काळात आपण एक मोबाईल नंबरदेखील लक्षात ठेवू शकत नाही.
४झाकीर हुसेन यांच्यासोबतची बालपणीची एखादी आठवण...
- झाकीरभाई व माझ्यात १२ वर्षांचा फरक आहे. ते माझ्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करतात. नव-नवीन वाद्ये ते माझ्यासाठी देश-विदेशातून घेऊन येत. त्यामुळे मला नवीन वाद्ये वाजविण्याची आवड निर्माण झाली.
४आई व तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल?
- साधारणत: आईचे मुलाशी तर वडिलांचे मुुलीशी अधिक जिव्हाळ्याचे नाते असते. पण माझी आई फार शिस्तप्रिय होती. आम्हाला नेहमी तिचा धाक असायचा. पण बाबा फार लाड करायचे. त्यामुळे बाबाच जास्त जवळचे वाटायचे. आईच्या धाकामुळे मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकलो. मुस्लिम समाजात मुलींना जास्त शिकवले जात नाही. परंतु माझ्या आईमुळे माझ्या बहिणी स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या. आईची माझ्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका होती.