शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘शोभेच्या’ फटाक्यांकडे ओढा, उत्साहात कुठेही कमतरता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:45 AM

कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे : कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे फटाके खरेदीवर जीएसटीदेखील आकारला जात असल्याने नागरिकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. मात्र अनेकांनी फटाका स्टॉलवर खरेदीस पसंती दिल्याचेही दृश्य बाजारपेठांमध्ये होते.सर्वाेच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठीच्या वेळेमध्ये बंधने आणली असली तरी फटाके उडविण्याचा नागरिकांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यंदा मात्र जास्त आवाज करणाºया फटाक्यांपेक्षा शोभेचे फटाके मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहेत. असे असले तरी या फटाक्यांची किंमत अधिक असून त्यात जीएसटीसुद्धा आकारला जात असल्याने फटाक्याच्या किमती यंदा कमालीच्या वाढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांचे छायाचित्र असलेले फटाके ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड, टॉलिवूडमधील कलाकारांच्या नावांचे फटाके आहेत.नदीपात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये २५० रुपयांपासून ते दीड-दोन हजारांपर्यंतचे फटाके विक्रीस उपलब्ध आहेत. यात आवाज करणाºया फटाक्यांचे प्रमाण कमी असून शोभेच्या फटाक्यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर चित्रपट कलाकारांच्या नावांचे, तसेच त्यांचे फोटो असलेले फटाकेसुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात कतरिना कैफ, करिना कपूर यांच्याबरोबरच बाहुबली फटाकासुद्धा विक्रीस ठेवण्यात आला आहे. आकाशात उडवल्या जाणाºया फटाक्यांना यंदा विशेष मागणी आहे.फटाकाविक्रेते हर्षल भोकरे म्हणाले, की यंदा फटाक्यांच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. त्यातच जीएसटीसुद्धा आकारला जात असल्याने जादा किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. तसेच यंदा मोठा आवाज करणाºया फटाक्यांपेक्षा शोभेचे अनेक फटाके दाखल झाले आहेत. ग्राहकांकडूनही शोभेच्याच फटाक्यांना मागणी आहे. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके घेण्यासाठी गर्दी कमी झाली आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेPuneपुणे