शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘प्रथम प्राधान्य’ फेरीत आरक्षण नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:21 IST

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीत आरक्षणाचा विचार केला जाणार नाही. रिक्त असलेल्या सर्व जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर प्रवेश मिळेल. दरम्यान, प्रवर्गनिहाय रिक्त जागा उपलब्ध करून न दिल्याने गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीत आरक्षणाचा विचार केला जाणार नाही. रिक्त असलेल्या सर्व जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर प्रवेश मिळेल. दरम्यान, प्रवर्गनिहाय रिक्त जागा उपलब्ध करून न दिल्याने गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून, सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम प्राधान्य’ ही फेरी राबवली जाणार आहे.आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त जागा जाहीर केल्या जात होत्या. त्यानुसार पसंतीक्रम भरून प्रवेश निश्चित केला जात होता. मात्र या फेरीत रिक्त जागा जाहीर करताना प्रवर्गातील सर्व रिक्त जागा खुल्या गटात टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व जागा उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयाची निवड करताना खुल्या किंवा कोट्यातील जागांवर प्रवेश घेता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.जे विद्यार्थी संगणकावर आधी ‘अ‍ॅप्लाय नाऊ’ या बटनवर क्लिक करतील त्यांचाच प्रवेश निश्चित होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या संगणकात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास, त्या भागात वीजनसल्यास, इंटरनेट धीम्या गतीने असेल तर त्यांना या प्रक्रियेत पसंतीच्या जागेपासून मुकावे लागणार आहे. त्यांना चांगले गुण असूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे दिसते.आजपासून गटनिहाय फेºया सुरूपहिली फेरी : ८० ते १०० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची असणार आहे.वेळ : सकाळी १० ते ५विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.केंद्रीय प्रवेश समितीकडून रविवारी ‘प्रथम प्राधान्य’ फेरीसाठी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, ही यादी प्रसिद्ध करताना त्यामध्ये एससी, एसटी असे कोणतेही प्रवर्ग ठेवलेले नाहीत. सर्व प्रवर्गातील रिक्त जागा एकत्रित करून त्या खुल्या गटात टाकण्यात आल्या आहेत.पहिल्या चार फेऱ्या आरक्षणनिहाय घेण्यात आल्या आहेत. ‘प्रथम प्राधान्य’ या फेरीत सर्वांना समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थी संख्या खूप कमी असल्याने प्रवर्गनिहाय प्रवेश होणार नाही. या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार सर्व शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्तीचे लाभ मिळतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.- दिनकर टेमकर, विभागीय शिक्षण उपसंचालक22363रिक्त जागांची संख्या3184व्यवस्थापन व इनहाऊस कोट्यातील रिक्त जागा25547जागा या फेरीसाठी उपलब्ध होणार