शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 18:55 IST

राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आम्हाला अजिबात हौस नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी आंदोलन करायला नको होत

पुणे : राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात मला अजिबात हौस नाही. पुण्याबाबत विचारणा होत असताना प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही. मी पालकमंत्री म्ह्णून निर्णय घेण्यास समर्थ आहे. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. 

ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतला. असं पवार म्हणाले.  राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यात पुण्याचाही समावेश होता. पण पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना सूट का मिळत नाही? असा सवाल पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांनी शिथिलता आणण्याबाबत प्रस्ताव पाठ्वल्याचे सांगितले होते. अजितदादांनी अप्रत्यक्षपणे त्यांना सल्ला दिला आहे.  

पुण्यात निर्बंध अखेर शिथिल करण्यात आले आहे. पण, मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्यातला वाद सोडवण्यासाठी बैठक घेऊन थेट निर्णय घेतला. पुण्यात दुकानं आता रात्री ८ वाजेपर्यत खुली राहणार आहे. तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका सुद्धा मांडली.

व्यापाऱ्यांचे आंदोलन चुकीचे 

व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही. सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही  पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्या