शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाच्या हंगामपूर्व बैठकीत थकीत एफआरपीवर चर्चाच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:53 IST

दरवर्षी मंत्री समितीच्या बैठकीत थकीत एफआरपीचा मुद्दा चर्चेला घेतला जातो.

ठळक मुद्देकपात, कामगारांची थकीत देणी, अशा १५ प्रकारच्या विषयांना मंजुरी अनेक कारखान्यांनी अजूनही दिलेली नाही एफआरपीची रक्कम

पुणे : ऊस गाळप हंगामपूर्व बैठकीत साखर कारखाना स्तरावर करण्यात येणारी कपात, कामगारांची थकीत देणी, शासकीय देणी अशा १५ प्रकारच्या विषयांनी मंजुरी देण्यात आली. मात्र, उसाचा रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) थकबाकी वसुलीचा विषयच बैठकीत घेतला नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघड केली आहे. राज्य सरकारने २०१८-१९च्या गळीत हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या मंत्री गटाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले याची माहिती स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी माहिती अधिकारात मिळविली आहे. या बैठकीत गाळप हंगाम सुरु करण्याबरोबरच ऊस बिलातील कपाती व ठेवी, कारखाना स्तरावरील कपात निधी, शासकीय थकबाकी, कामगारांची देणी, महसुली उत्पन्न विभागणी सूत्र (आरएसएफ), प्रति युनिट १.२० रुपये विद्युत शुल्क रद्द करणे, साखर निर्यात आणि इथेनॉल धोरणाबाबत निर्णय घेण्यात आला. एफआरपी दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन ४ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निधासाठी प्रतिक्विंटल साखरेमागे १ रुपया, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना वगर्नी प्रतिक्विंटल १ रुपया, साखर संकुल देखभाल व दुरुस्तीसाठी ५० पैसे प्रतिटन आणि प्रस्तावित गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार मंडळासाठी प्रतिटन १ रुपया कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यातील महत्त्वाचा घटक असलेल्या ऊस उत्पादकांच्या थकबाकी वसुली बाबत कोणताच निर्णय या बैठकीत घेतला गेला नसल्याचे दिसून असल्याचे पांडे म्हणाले.       पांडे म्हणाले, दरवर्षी मंत्री समितीच्या बैठकीत थकीत एफआरपीचा मुद्दा चर्चेला घेतला जातो. मंत्री समितीच्या हंगामपूर्व बैठकीत थकीत एफआरपीबाबत चर्चाच झाली नाही. हा प्रकार धक्कादायक आहे. एफआरपीबाबत सरकार तितकेसे संवेदनशील नसल्याचे यावरुन दिसते. तसेच, यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत. अनेक कारखान्यांनी अजूनही एफआरपीची रक्कम दिलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना