शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

पुण्यातील प्रभात रस्त्याची लागली ‘वाट’, ठेकेदारांवर नियंत्रणच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:38 IST

महापालिकेत समन्वयाचा अभाव : ठेकेदारांवर अभियंत्यांचे नियंत्रणच नाही

पुणे : वर्षभरापूर्वीच काही लाख रुपये खर्च करून काळा कुळकुळीत व गुळगुळीतही केलेल्या प्रभात रस्त्याची फक्त दोन ते तीन आठवड्यांतच वेगवेगळ्या कामांनी वाट लागली आहे. एकाच वेळी महापालिकेची तीन कामे या रस्त्यावर सुरू असून, त्यात त्यांनी चांगल्या डांबरीकरणाचा हा रस्ता खडीकरणाचा करून टाकला आहे.

लॉ कॉलेज रस्त्यावरून सुरू होऊन थेट डेक्कनपर्यंत हा रस्ता जातो. साधारण वर्षभरापूर्वीच त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली. पदपथ तयार करायचा आहे, असे त्या वेळी सांगण्यात आले. ते काम सुरू झाले. त्यानंतर लगेचच रस्त्याची दुसरी बाजू खोदायला सुरुवात झाली. तिथे ड्रेनेजलाईन टाकायची अशी माहिती मिळाली. तेही काम सुरू झाले. आता ही दोन्ही कामे सुरू असतानाच रस्त्याचेच काही काम तिथे सुरू करण्यात आले आहे.पदपथाच्या कामाची खडी, फरशा व अन्य साहित्य रस्त्याच्या मध्ये येणार नाही या पद्धतीने ठेवण्याची जबाबदारीही ठेकेदाराचीच आहे. मात्र, ठेकेदाराचे कामगार रस्त्याच्या मध्येच सर्व साहित्य ठेवतात व काम करत राहतात. त्यामुळे वाहनधारकांची अडचण होते. ती होऊ नये अशा पद्धतीने ठेकेदाराने काम करणे अपेक्षित आहे.

ठेकेदारांच्या कामावर कोणाचेच नियंत्रण नसते. तिथे पालिकेच्या पथ विभाग, बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग किंवा ज्या विभागाचे काम सुरू आहे त्या विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे असते. मात्र तेही होताना दिसत नाही. अभियंते काम सुरू असते, त्या ठिकाणी फिरकतही नाहीत. खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे शहरात बहुसंख्य ठिकाणी याच पद्धतीने चांगल्या रस्त्यांची वाट लावली जात आहे. केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडूनही रस्त्यांची अशीच बेसुमार खोदाई केली जात आहे. त्यांचे ठेकेदारही रस्ता खोदला की तो नीट बूजवत नाहीत. चांगले डांबरी रस्तेही खोदून खराब केले जातात व त्यानंतर पुन्हा त्यावरडांबरीकरणाचे काम प्रस्तावित केले जाते.

एकाच वेळी तीन-तीन कामे सुरू४एकाच वेळी सुरू असलेल्या या तीन-तीन कामांनी रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. ठेकेदार त्यांच्या मर्जीला वाटेल तसेच काम करत आहेत.४ड्रेनेजचे पाइप बरेच मोठे आहेत. ते रस्त्यात टाकताना रस्ता जवळपास मध्यापर्यंत खोदण्यात आला. पाइप टाकून झाल्यावर खड्डा बुजवण्याची जबाबदारी ठेकेदाराचीच आहे. ते काम नीट न करता फक्त माती टाकून दिली जाते. ती खचते व डांबरी रस्ता व हा खड्डा खोदून बुजवलेला रस्ता खालीवर होतो. त्यात दुचाकी अडकतात व पडतात.

प्रभात रस्त्यावर या पद्धतीने काम सुरू आहे हे खरे आहे. एकाच वेळी अशी तीन कामे शक्यतो होत नाहीत, तिथे झाली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हेही खरे आहे. पथ विभागाच्या वतीने ठेकेदारांना समज देऊन नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीने काम करण्यास सांगण्यात येईल. काम झालेल्या ठिकाणी खड्डा नीट बुजवण्याची काळजीही घेतली जाईल.- अनिरुद्ध पावसकर,प्रभारी अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका

 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा