शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुणेकरांवर करवाढ नाही; महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल ९ हजार ५०० कोटींचे बजेट सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:56 IST

पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार

पुणे : पुणे महापालिकेचा २०२३-२४चा अर्थसंकल्प आज आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सादर करण्यात आला. पुणे महापालिकेचे २०२३-२४ वर्षासाठी  साठी ९ हजार ५१५ कोटींचे बजेट सादर करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर कोणतीही करवाढ केली नसल्याचे बजेटमधून दिसून आले आहे.  हे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाणार होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अर्थसंकल्प सादर करता आले नाही. आज अखेर अर्थसंकल्पाला मुहूर्त लागला.  

आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केले होते. त्यामध्ये ४ हजार ८८१ कोटींची महसुली कामे, तर ३ हजार ७१० कोटी भांडवली प्रस्तावित केली होती. २०२१-२२ आयुक्तांनी ७ हजार ६५० कोटीचे अर्थसंकल्प तयार केले होते. यात हजार कोटीची वाढ केली होती. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये २२२ कोटींची वाढ आयुक्तांनी केली होती. आयुक्तांनी बजेट सादर केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करता आले नव्हते. त्यांचा कालावधी संपला होता. पुढे आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरच अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांना याच पद्धतीने दुसरे अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे.

पुणे महानगर पालिकेचे प्रशासकीय अर्थसंकल्प २०२३-२४ 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी मांडले ९५१५ कोटी रुपयांचे बजेट 

- मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर- यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठा साठी- पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रुपयांची तरतूद- शहरातील मलनिसारण साठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटी- वाहतूक नियोजन व प्रकल्प साठी ५९० कोटी रुपये- पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद तर पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद- पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये - आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद- नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद- मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ नाही- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार- नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद- पगार आणि पेन्शन वर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार

पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प

- पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार

- वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

- सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार

- डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश

- शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील hawkers प्लाझा/  hawkers पार्क उभी करणार

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMONEYपैसाBudgetअर्थसंकल्प 2023