पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री शांत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत. संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना अधिकार असल्याने अशा चर्चा सुरू आहे. शिंदे समिती आज भेटली आहे. सरकार प्रयत्न करत असते. समन्वयने प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यासाठी चर्चा सुरू केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि 11 जणांची एक समिती आहे. ते त्या संदर्भात चर्चा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1471121347471147/}}}}
प्रभाग रचनेवर एकत्रित निर्णय घेऊ
नव्याने काही प्रभाग रचना झाल्या त्याबद्दल काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पालिका आयुक्त यांना घेऊन बैठक घेतली. पिंपरी चिंचवड मध्ये काही प्रभाग बदलले नाहीत. पुण्यामध्ये मात्र थोडा बदल झाला आहे. त्याबद्दल आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून वरिष्ठ स्तरावर निर्णय घेऊ. पण आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा होईल एकदा अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर तिन्ही नेते बसून बसून निर्णय घेऊ. स्वबळाचा नारा मी कुठलाही दिलेला नाही. तो आमचा अंतर्गत निर्णय आहे याची चिंता तुम्ही करू नका असं अजितदादा यावेळी म्हणाले आहेत.