शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:00 IST

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चाैधरी : आठवे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान

पुणे : गेल्या काही दशकांत दलित, ओबीसी जागृत झाले. आता महिलादेखील जागृत होऊ लागल्या आहेत. राज्यात ७५०० रुपये महिलांच्या हातात आले. या पैशातून महिलांनी भाजी, साडी विक्री असे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे महिलांनी महायुतीला मतदान करण्याचे ठरविले. आता कोणतेही सरकार आल्यावर ही योजना बंद करता येणे कठीण आहे. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती असली, तरी या योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय भाष्यकार नीरजा चौधरी यांनी सांगितले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) व पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या वतीने ८ वे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात ' पाॅलिटिकल डिसीजन मेकिंग एट् द टाॅप् ग्रोविन्ग् चॅलेंजेस" या विषयावर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण, लतिका पाडगावकर, अभय वैद्य यावेळी उपस्थित होते.नीरजा चौधरी म्हणाल्या, सर्वोच्च स्तरावर घेतलेले निर्णय देशातील कोट्यवधी लोकांवर, पिढ्यांवर परिणाम करणारे ठरतात. उदाहरणार्थ, मंडल आयोगाचा निर्णय. त्यानंतर देशात ओबीसीची शक्ती वाढू लागली. त्यामुळेच आज देशात ओबीसी असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणी घेतलेल्या निर्णयाने देशात गदारोळ झाला. ती परिस्थिती कशी हाताळायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातूनच मुस्लिमांचे लांगूलचालन हा शब्दप्रयोग सुरू झाला. पुढारलेला विचार करणाऱ्या पंतप्रधानांना जुन्या भारताला कसे हाताळायचे हे कळले नाही.प्रत्येक निवडणुकीत नवा मतदार उदयाला येतो. आज रोजगार देशातील सर्वांत ज्वलंत विषय असूनही तो निवडणुकीचा मुद्दा होत नाही. त्याशिवाय पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान असे मुद्दे मागे राहिले आहेत. जगातील कोणत्याही देशात भारताइतकी विविधता नाही. ही विविधता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. त्या बाबतीत निर्णय प्रक्रिया, धोरणांवर काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. रामकृष्णन रमण यांनी स्वागतपर भाषण केले. लिसा पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. अभय वैद्य यांनी आभार मानले.हे शतक देशातील महिलांचे..आतापर्यंत महिला त्यांच्या घरातील पुरुषांच्या मतानुसार मतदान करीत होत्या. आता ही परिस्थिती बदलत आहे. डोक्यावरचा पदर थोडा बाजूला होत आहे. पैसा हाती येणे हे महिलांसाठी सबलीकरण आहे. हे शतक देशातील महिलांचे असल्याचे नीरजा चौधरी म्हणाल्या. 

टॅग्स :Puneपुणेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाGovernmentसरकारMahayutiमहायुतीBJPभाजपा