पुणे : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी अनेक शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या घटनेवर शंका उपस्थित केली होती.
अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात ६ लोक होते, मग ५ जणांचे मृतदेह कसे मिळाले? अजित पवार यांचे विमान हवेत असतानाच तीन स्फोट झाले, ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला होता. यावरून रोहित पवारांनी विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते असे वक्तव्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, सगळ्यांच्या मनात शंका आहे. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. का घडलं? कसं घडलं? असावं याबाबत दहा तारखेला सर्व काही सांगणार आहे. आमच्या मनात अनेक शंका आहेत. बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं आहे. बॉम्ब सारखी काही गोष्टी असू शकतात. दहा तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत. त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या जवळचा कार्यकर्ता होता. काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडत आहेत. काही विषयाच्या बाबतीत ते भावनिक आहेत. भावनिकतेच्या भरात अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. मी सीसीटीव्ही पासून सर्व गोष्टी वरती प्रेझेंटेशन मध्ये भाष्य करणार आहे.
रोहित पवारांनी सुनील तटकरे यांना उत्तर दिले आहे. मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल. मात्र मला भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावरती मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही. आम्ही भावनिक आहोत. राजकारणात आम्ही भावनिक जे वाटेल ते बोलू शकतो.
दादांची इच्छा पूर्ण होईल
ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून मी मतदान घेऊन या ठिकाणी मतदान करत आहे. या मतदान केंद्रावर आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. दादा बरोबर चर्चा माझ्या ध्यानामध्ये मनामध्ये मला ऐकू यायला लागली. दादांचा जे स्वप्न होतं. कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे .जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या विचाराचे निवडून आले पाहिजेत ही दादांची इच्छा होती. मतदार त्यांची इच्छा पूर्ण करतील जास्त उमेदवार दादांची निवडून येतील.
Web Summary : Doubts surround Ajit Pawar's plane crash. Sonawane questioned a possible bomb. Rohit Pawar acknowledged suspicions, promising a detailed presentation addressing concerns about the incident and CCTV footage. He asserted his emotional right to speak on the matter.
Web Summary : अजित पवार के विमान हादसे पर संदेह गहराया। सोनवणे ने बम की आशंका जताई। रोहित पवार ने संदेहों को स्वीकार करते हुए घटना और सीसीटीवी फुटेज पर विस्तृत प्रस्तुति का वादा किया। उन्होंने इस मामले पर बोलने का भावनात्मक अधिकार जताया।