शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:25 IST

एसटी बस व रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मात्र घट; वर्षभरात ७२ लाख जणांचा हवाई प्रवास

पुणे : महापालिकेच्या वतीने सन २०१७-१८चा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल बुधवार (दि.२५) रोजी सादर केला. यामध्ये पुण्यात विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले. विमानप्रवासी संख्येत वाढ होत असतानाच, एसटी आणि रेल्वेप्रवासी संख्येत चांगलीच घट झाली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले.महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये हवा प्रदूषणाचे संभाव्य स्रोत यामध्ये वाहनांची वाढती संख्या, यात विमान, एसटी आणि रेल्वेप्रवासी संख्या आदी विविध गोष्टीची सविस्तर माहिती देण्यात आली. यात पुण्यात गेल्या पाच वर्षांत विमान प्रवाशांच्या संख्येत कशी वाढ होत गेली, याची सविस्तर आकडेवारी दिली आहे. यामध्ये सन २०१७-१८ मध्ये पुण्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ७१ लाख ९९ हजार ८५५ पुणेकरांनी एका वर्षात विमानप्रवास केला. पुण्यातून दररोज २२ हजार ४६६ लोक विमानप्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा विमानप्रवासी संख्येत तब्बल ६ लाख ८७ हजारांची वाढ झाली आहे.पुण्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच रेल्वे आणि एसटी बसने प्रवास करणाºयांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत असल्याची वस्तुस्थित या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात पुण्यातून सन २०१७-१८ या एका वर्षांत ७७७.२३ लाख लोकांनी रेल्वेने प्रवास केला. हीच संख्या सन २०१६-१७ मध्ये ७९५.३६ लाख एवढी होती. तर एसटीच्या प्रवासी संख्येत देखील मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. सन २०१७-१८ मध्ये पुणे शहरातून राज्य, परराज्यात प्रवास करणाºया पुणेकरांची संख्या १०६८.५८ लाख एवढी आहे. दिवसाला सुमारे २ लाख ९३ हजार लोक एसटीने प्रवास करतात. सन २०१६-१७ च्या तुलनेत प्रति दिन तब्बल ११ हजारांनी एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे.

टॅग्स :airplaneविमानPuneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळrailwayरेल्वे