शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

...तर आम्ही आत्महत्या करु ; वडगाव मावळ येथे क्वारंटाईन केलेल्यांची पोलिसांकडे भलतीच मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:48 PM

४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना या लोकांनी केला.

ठळक मुद्देवडगाव येथून हालवून क्वारंटाईन लोकांना त्यांच्या घरी पाठवावे, ग्रामस्थांची मागणी

मावळ : होम क्वारंटाइनचा शिक्का असताना उमरगा (जि.उस्मानाबाद ) येथून मुंबईकडे जाणाऱ्या १६ जणांना वडगाव पोलिसांनी पकडले. त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूम येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना या लोकांनी केला. पोलिसांनी वडगाव येथे त्यांना ताब्यात घेतले.याप्रकरणी मैनुद्दीन शरमुद्दीन शेख रा.अंधेरी असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारंटाईन केलेल्या लोकांनी आता पोलिसांकडे भलतीच मागणी केली आहे.  आम्हाला खायला मांसाहार, गुटखा, सिगारेट, तंबाखू द्या .द्यायला जमत नसेल तर घरी सोडा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा सज्जड दम वडगाव येथे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांनी दिला आहे.तसेच या लोकांनी खुर्चांची मोडतोड केली.गेल्या तीन दिवसांपासून यांना भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी दोन एसी रूम असून सकाळी २२ बिस्कीट पुडे, चहा,जेवण, दुपारी पुन्हा चहा बिस्कीट, रात्री जेवण दिले जाते अशी माहिती वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली. तरी देखील मांसाहार, तंबाखू, सिगारेटची मागणी करतात. गुड्डेच बिस्कीट पाहिजे असा हट्ट करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही जणांनी येथील खुर्चांची मोडतोड करत बेसीनही फोडले. आम्हाला घरी सोडा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा दम देतात. तसेच आतील कचरा शेजारी राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या घराजवळ टाकतात. या सर्व जणांना  वडगाव येथून हालवून त्यांना त्याच्या घरी पाठवावे अशी मागणी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वडगाव पोलिसांकडे केली आहे. २४ तास ड्युटी करून पोलिसांचे अतोनात हाल झाले आहेत.त्यात यांच्या त्रासाने पोलिसही वैतागले आहेत.

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस