शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

...तर वर्षभरासाठी ठेकेदार निलंबित : प्रवीण माने; पुणे जिल्हा परिषदेची बिले आता ‘डिजिटल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 12:51 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची संपूर्ण बिले आता डिजीटल स्वरूपात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, यापुढे प्रत्येक ठेकेदाराने ई-टेंडरिंगची वर्क आॅर्डर मिळाल्यानंतर आठ दिवसांत काम सुरू करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देअनेक सदस्यांनी ठेकेदारांच्या कार्यपद्धतीविषयी व्यक्त केली नाराजीसूरज मांढरे यांच्या निर्णयामुळे आठ ते दहा टेबलांवरील फायलींचा होणारा प्रवास थांबणार

पुणे :  जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची संपूर्ण बिले आता डिजीटल स्वरूपात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, यापुढे प्रत्येक ठेकेदाराने ई-टेंडरिंगची वर्क आॅर्डर मिळाल्यानंतर आठ दिवसांत काम सुरू करणे बंधनकारक आहे. हे काम सुरू न झाल्यास पुन्हा टेंडरिंग काढून त्या ठेकेदाराला वर्षभरासाठी काळ्या यादीत टाकले जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिला आहे. बांधकाम समितीची शुक्रवारी बैठक झाली. या वेळी वरील निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी अनेक सदस्यांनी ठेकेदारांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे याची गंभीर दखल घेत बांधकाम सभापती यांनी यापुढे ठेकेदारांवर काम सुरू करणे बंधनकारक असून, तशा सूचना ठेकेदारांना देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. प्रवीण माने म्हणाले, की ठेकेदाराने वेळेत काम सुरू करणे बंधनकारक आहे. याचबरोबर ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत वेळोवळी अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. आतापर्यंत जि. प. बांधकाम विभागाच्या कामांची ४० टक्के बिले लिखित स्वरूपात मिळत होती. मात्र, आता सर्व प्रकारची बिले डिजिटल स्वरूपात काढण्याचा निर्णय घेतला आहे.

टेबलांवरील फायलींचा प्रवास होणार कमी विविध विभागांमधील विकासकामांच्या मंजुरीसाठी फायलींचा प्रवास तब्बल आठ ते दहा टेबलांवरून होत असल्याचे चित्र सध्या आहे. आता तो कमी करून अवघ्या दोन ते तीन टेबलांवरच अंतिम निर्णय करण्यात येईल. यासाठी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला आहे़ मांढरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बांधकामे ही चांगल्या दर्जाची होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद टक्केवारीतून मुक्त होण्यासही मदत होणार आहे़ सद्य:स्थितीत ठेकेदाराने बांधकाम पूर्ण केल्यानंतर संबधित उपअभियंता बिलाची फाईल तयार करतो. ती हाताने लिहिली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असते़  यामध्ये बऱ्याच त्रुटी असल्याने त्याला बराच वेळ लागतो. मात्र, सूरज मांढरे यांच्या या निर्णयामुळे आता आठ ते दहा टेबलांवरील फायलींचा होणारा प्रवास थांबणार आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPuneपुणे