शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 18:26 IST

केरळमधील पूर अाेसरला असला तरी पसरलेल्या अस्वच्छतेमुळे केरळवासियांना साथीचे अाजार हाेण्याची वर्तविण्यात येत अाहे.

पुणे : केरळमधील पुर ओसरला तर अजूनही स्थिती भयानक आहे... अनेकांचा संसार वाहून गेलाय... सामानाची शोधाशोध सुरू आहे... घरे, परिसर, रस्त्यांची साफसफाई केली जातेय... पण महापूराने घातलेल्या थैमानाने अजूनही अनेक भागात घाणीचे साम्राज्य आहे... मेलेली जनावरे ठिकठिकाणी दिसतात... लोकांमध्ये त्वचेचे आजार, उलट्या, जुलाबाचे प्रमाण अधिक आहे... त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छता न झाल्यास केरळवासियांना मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो... ही स्थिती मांडली आहे ससून रुग्णालयातून केरळमध्ये गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. गजानन भारती यांनी.

    ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. भारती यांच्या नेतृत्वाखाली २६ डॉक्टर्स दि. २० आॅगस्ट रोजी केरळमध्ये गेले आहेत. अजून दोन-तीन दिवस ते तिथे वैद्यकीय सेवा देऊन पुन्हा पुण्यात परतणार आहेत. मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत आहे. केरळमधील एर्नाकुलम, अल्लप्पी आणि थ्रिसुर या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने सर्वाधिक थैमान घातले आहे. या भागातच डॉ. भारती व त्यांचे सहकारी मागील सात दिवसांपासून मदत छावण्यांमधील लोकांची सेवा करीत आहेत. दररोज शेकडो जणांवर उपचार करून त्यांना मानसिक आधारही द्यावा लागत आहे. मागील आठ दिवसांत पाऊस थांबल्याने पुरही पुर्णपणे ओसरला आहे. पण या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण खुप मोठे आहे. ही स्थिती पुर्ववत करण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत.

    मागील सात दिवसांत ठिकठिकाणी जाऊन डॉक्टरांनी लोकांवर उपचार केले आहेत. याविषयी माहिती देताना डॉ. भारती म्हणाले, तेथील जिल्हा रुग्णालयांकडून छावण्यांची माहिती दिली जात आहे. तसेच तिथे जाण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था केली जाते. त्यानुसार तीन जिल्ह्यांमधील छावण्यांमध्ये जाऊन दिवसभर उपचार केले जात आहे. मदतीचा ओघ मोठा असल्याने पुरेशी औषधे, साहित्य उपलब्ध आहे. मागील काही दिवसांत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. मानसिक ताणातून त्यांना जावे लागत आहे. तसेच सध्या पुरामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणीही सहजासहजी मिळत नाही. अनेक लोक अजूनही शाळा, चर्च, मंदीरे, तात्पुरत्या छावण्यांमध्ये एकत्र राहत आहेत. इथे गरीब, श्रीमंत सर्वच जण आहेत. ---------------साफसफाईची अावश्यकता सध्या तेथील नागरिकांना डोकेदुखी, अंगदुखीच्या तक्रारी खुप आहेत. पाण्याच्या समस्येमुळे जुलाब, उलट्या यांसह अन्य जलजन्य आजार आहेत. सतत पाण्यात राहिल्याने अनेकांना त्वचेचे आजार झाले आहेत. अद्याप कोणत्याही साथीच्या आजारांचा धोका नाही. मात्र, अनेक ठिकाणी प्रवासादरम्यान रस्त्याच्या आजूबाजूला मेलेली जनावरे आढळून आली. अनेक भागातील अजूनही साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जनावरे आता कुजण्यास सुरूवात झाली आहे. हे प्रमाण वाढत गेल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. साथीचे आजार एका दिवसात पसरत नाहीत. त्यासाठी किमान पंधरा दिवस जावे लागतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत साफसफाई वेगाने व्हायला हवी, असे डॉ. भारती यांनी सांगितले.---------------ओनमचा उत्साह नाही  

पुर ओसरला असला तरी अजूनही जवळपास ८० टक्के नागरिक छावण्यांमध्येच आहेत. पुराचे पाणी दोन मजल्यांपर्यंत गेले होते. त्यामुळे अनेकांचा संपुर्ण संसार पुरात वाहून गेला आहे. घरांची स्थिती खुप वाईट आहे. त्यामुळे अनेक जण दिवसभर त्यांच्या घराची साफसफाई करतात. केवळ जेवण व झोपण्यासाठीच छावणीत येतात. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी ‘ओणम’ हा सण सुरू होऊनही त्याचा उत्साह दिसत नाही. स्वच्छता करूनच आपल्या घरात सण साजरा करायचा, असे म्हणून ते कामाला लागले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेKeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरHealthआरोग्य