... तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, चंद्रकांत पाटलांच विरोधकांना चॅलेंज 

By महेश गलांडे | Published: November 2, 2020 10:37 PM2020-11-02T22:37:45+5:302020-11-02T22:37:57+5:30

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

... then I will go to the Himalayas forever, Chandrakant Patel will challenge the opponents | ... तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, चंद्रकांत पाटलांच विरोधकांना चॅलेंज 

... तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, चंद्रकांत पाटलांच विरोधकांना चॅलेंज 

Next
ठळक मुद्देकोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमीच टीका करण्यात येते. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरऐवजीपुणे मतदारसंघातून निवडणूक लढविल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून ही टीका होत असते. चंद्रकांत दादांनी सुरक्षित मतदारसंघ निवडल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या या टीकेला आव्हानात्मक उत्तर दिलंय. पोटनिवडणूक घ्या आणि कोल्हापूरातील कुठल्याही मतदारसंघातून मला पराभूत करुन दाखवा, असे चॅलेंजच चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिलंय.  

''जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले, ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांचे तिकीट जाहीर होण्यापूर्वीचा किस्साही यावेळी सांगितला. केवळ, तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहांच्या आग्रहास्तव मी कोथरुडमधून निवडणूक लढविल्याचे पाटील यांनी सांगितले. अमितभाई म्हणाले, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. यावेळी, अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?  मी जर मोकळा राहिलो तर महाराष्ट्रभर फिरेन. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या जास्त जागा निवडून आणू, असे मी त्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले. मात्र अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून पुण्यातील कोथरुड येथूनच असंही आवर्जून सांगितलं. त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि मी निवडणूक लढवली जिंकली, असा किस्सा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला. 

आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणीही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत राहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो आहे. कोथरुडचा आमदार होऊन मला वर्ष झाले. या दरम्यानच्या काळात अनेक व्यक्तींनी सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी असून या पुढील काळात अनेक उपक्रम राबविणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: ... then I will go to the Himalayas forever, Chandrakant Patel will challenge the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.