शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न; पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 21:57 IST

प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांचा मार्केटयार्ड येथील प्रेमनगर सोसायटीमध्ये 'शिल्पकला' या नावाचा बंगला आहे.

पुणेः प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या बंगल्यात घरफोडी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पकडले. अजय मल्हारी खरात (वय २०, रा. पदमावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी खेडकर यांचा नातू संजय विश्वनाथ ओव्हाळे (वय ५०, रा. धनकवडी) यांनी मार्केटयाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओव्हाळ यांचे आजोबा व प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांचा मार्केटयार्ड येथील प्रेमनगर सोसायटीमध्ये 'शिल्पकला' या नावाचा बंगला आहे. त्यांचे निधन झाल्याने सध्या या बंगल्यात कोणी राहत नाही. ओव्हाळे हेच अधूनमधून बंगल्यात जाऊन पाहणी करतात. बंगल्याच्या खालच्या मजल्यावर एक डॉक्टर भाड्याने राहतात. २४ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना भाडेकरु डाॅक्टरांचा ओव्हाळे यांना फोन आला. वरच्या मजल्यावर कोणीतरी व्यक्ती शिरला असून त्याचा आवाज येतो आहे. चोर शिरल्याचा संशय आल्याने ओव्हाळे यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली व त्यांनी आजोबांच्या बंगल्याकडे धाव घेतली.

सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके, पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शिंदे व दोन पोलीस घटनास्थळी पोहचले. बंगल्याशेजारी राहणारे व त्यांचे नातेवाईकही त्या ठिकाणी आले. पोलीस व ओव्हाळे यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांना चोरटा हा गॅलरीची खिडकी उघडून आत शिरल्याचे आढळून आले. काही वेळात आणखी पोलीस कुमक आली. काही पोलीस बंगल्याच्या मुख्य दरवाजात त काही गॅलरीजवळ थांबले. काही जणांनी आत जाऊन एका तरुणाला पकडून आणले. त्याच्याकडे काहीही मौल्यवान वस्तू आढळून आल्या नाहीत. बंगल्यातील काही वस्तू चोरीला गेल्या नसल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखाने यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अजय खरात याला पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकThiefचोर