शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी; देवीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:42 IST

रविवारी सकाळी परिसरातील नागरिक व पुजार्‍यांना मंदिराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले.

पुणे : नाना पेठेतील शितळादेवी मंदिरातील देवीचे चांदीचे दागिने आणि रोकड असा ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपात केला आहे. चोरट्यांनी चोरी करुन जाताना येथील सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरुन नेला आहे़ 

शितळादेवी मंदिर काही वर्षांपूर्वी एका वाड्यात होते. वाडा पाडून तेथे सोसायटी बांधण्यात आली. सोसायटीच्या पार्किंगच्या परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी इमारती आहेत.

रविवारी सकाळी परिसरातील नागरिक व पुजार्‍यांना मंदिराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पहाणी केली असता, देवीचे चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. यानंतर तेथील रहिवाशी भारत कोटा(वय ४०) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्याने मूर्तीचे दागिने व दानपेटीत जमा झालेली रक्कम चोरली. दान पेटीत नक्की किती रक्कम होती हे कळू शकले नाही.

चोरट्याने जाताना सीसीटीव्हीचे रेकॉर्डरही चोरुन नेले. यामुळे मंदिर नक्की किती वाजता फोडण्यात आले व किती चोरटे होते हे समजू शकले नाही. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीTempleमंदिरcctvसीसीटीव्हीThiefचोर