शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 20:52 IST

 पोलीस कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते.

ठळक मुद्देपोलीस कर्मचारी पालखी ड्युटीवर गेल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस जवाच्या घरी चोरांनी चोरी करून जवळपास साडे तीन लाख रुपयांचे सोने व पैसे लंपास केल्याची घटना सोमवार ( दि. १ ) रोजी घडली आहे. चोरांचा पोलिसांच्या घरी चोरी करण्याची हिंमत पाहून इंदापूर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे, आणि प्रत्येक जण म्हणतो आहे, अबब.. पोलिसाच्या घरीच चोरी...! पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे ( वय २८) रा. अंबिकानगर, अंबिका आपार्टमेट, इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे हे त्या ठिकाणी सपत्नीक भाड्याने राहत असून, त्यांची पत्नी त्यांच्या मुळ गावी पर्यती ता.माण जि.सातारा याठिकाणी सुट्टीसाठी गेले आहेत.  नरळे हे २८ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पासून संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते. त्यांचाच फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे. दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७. ३० त्यांच्या अपार्टमेंट मधील डॉ. माने यांनी त्याचे मोबाईलवरुन नरळे कळविले की तुमचे घराचे दार उघडे आहे. त्यावेळी नरळे उंडवडी सुपे येथून पालखी बंदोबस्त करुन लागलीच इंदापुर येथे आले. त्यावेळी त्यांनी घराची पाहण केली असता त्यांना त्यांच्या घराचे दार उघडे दिसले म्हणुन त्यांनी घरात जावुन पाहीले तर घरातील लोखंडी कपाटातील सामानअस्थाव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी कपाटाची बारकाईने तपासणी केली असता, त्यांनी घरात ठेवलेले कपाटातील रोख रक्कम ९ हजार ५०० रुपये तसेच सोन्या चांदिचे दागिने दिसुन आले नाहीत. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या रहात्या घराचे कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहेत. त्यामध्ये चोरीस गेलेले रोख रक्कम व सोन्याचांदीचे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सहा तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण, ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन तोळे एक ग्रॅम वजनाचे बदाम असलेले दोन सोन्याच्या चैन, ५७ हजार ५०० रुपये किंमतीच्या दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे त्यामध्ये लहान मोठ्या सहा अंगठ्या दोन बदाम, ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा एक तोळा तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपये किंमतीचे एक तोळा दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टाँप्सचे दोन नग, प्रत्येकी ११ मलदार सोन्याचे मणी असलेले लहान बाळाच्या दोन मनगट्या, सोन्याचे सुट्टे मणी, २ हजात ५०० रुपये किंमतीच्या दोन सोन्याचे नथ, ६ हजार रुपये किंमतीच्या अंदाजे पंधरा भार वजनाच्या चांदीचे दागिने त्यामध्ये ब्रेसलेट,चांदीची वाटी, चमचा, चांदीचा करगोटा, मनगटी दोन, जोडवी, व ९ हजार ५०० रुपये रोख रक्कम त्यामध्ये दोन हजार रुपये दराच्या दोन नोटा, ५०० रुपये दराची एक नोट, १०० रुपये दराच्या ५० नोटा असा एकुण ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत ( दि. १ ) रोजी रात्री उशिरा अर्जुन नरळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम गोमरे करीत आहेत.  

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस