शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बारामती: शिरसाई देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून सोन्या-चांद्याची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 12:21 IST

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे

उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील प्रसिध्द शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली. मंदिराच्या गेटला असलेले कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह २० किलोचा पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर सामान असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरीचा तपास सुरू आहे.

शिरसाई मंदिरात काकड आरती चालू असल्याने पहाटे साडेचार वाजता मंदिरातील पुजारी व गावकरी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. बारामती येथील पोलिसांनी पंचनामा करुन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. यात एक महिला व दोन पुरुष असल्याचे माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.

बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शुक्रवार मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सकाळी पुजाऱ्यांनी ग्रामस्थांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे. शिरसाई देवीच्या मंदिरातील दागिण्यांची चोरी झाल्याने ग्रामस्थ, सर्व लहान मोठे व्यवसायिक आणि व्यापारी यांनी निषेधार्थ गावत बंद पाळला आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी