आंबाडे येथील जानुबाई मंदिरात ६ लाख ३० हजाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:45+5:302021-03-17T04:12:45+5:30

-- भोर : मांढरदेवी रस्त्यावर असलेल्या आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबाडे येथील श्री जानुबाई मंदिराच्या दरवाजाचा कंडीकोयड्या ...

Theft of 6 lakh 30 thousand in Janubai temple at Ambade | आंबाडे येथील जानुबाई मंदिरात ६ लाख ३० हजाराची चोरी

आंबाडे येथील जानुबाई मंदिरात ६ लाख ३० हजाराची चोरी

--

भोर : मांढरदेवी रस्त्यावर असलेल्या आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबाडे येथील श्री जानुबाई मंदिराच्या दरवाजाचा कंडीकोयड्या तोडून ६ लाख ३० हजार रुपयाचा सोने,चांदीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवार ( दि. १६ ) रोजी मध्यरात्री घडली.

भोर तालुक्यात ४ दिवसात १६ किलो चांदी ३ तोळे सोने असा एकुण १० लाखाचा मुददेमाल चोरीला गेला यामुळे तालुक्यातील गावातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

याबाबत भोर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जानुबाई मंदिरांत रात्रीच्या सुमारास मंदिरातील प्रवेशव्दार आणि गाभाऱ्यातील दरवाजाच्या कंडीकोयडा तोडून देवीचा एक लाख रुपये किमतीचा मुखवटा, भैरोबा देवाचा एक लाख ५० हजार रुपयाचा मुखवटा , ५० हजार रुपयाचे चांदीची छत्री, ३ लाख २० हजारांची देवीच्या मागची प्रभावळ, सोने, चांदी असा ४ किलोचा, तर लक्ष्मी नारायणाची २०० ग्रॅम असलेली १० हजार रुपयाची मुर्ती अशा ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही बाब पुजारी सुदाम सदाशिव गाडे यांच्या लक्षात आली त्यांनी पोलिसांना कळविली.

भोर प्रभारी पोलिस निरीक्षक प्रविण मोरे,सहाय्यक पोलिस राजेंद्र पवार, जानुबाई देवी मंदिर ट्रस्ट प्रदिप खोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीचा पंचनामा करण्यात केला दरम्यान भोर तालुक्याच्या भागातील मंदिरांमधील देवांचे मुखवटे चोरणाऱ्या टोळीचा सुळसुळाट पाहल्या मिळत आहे भोर परिसरात दोन दिवसात चार मंदिरांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. यात केतकावळे, पिसावरे ,सावरदरे ,आंबाडे या गावांमधील मंदिरात रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे. देवांचे चांदी सोन्याचे मुखवटेच चोरत आहेत एका रात्री अनेक ठिकाणी चोरी होत असल्यामुळे मुखवटे चोरणारी टोळीच सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज पहाटे आंबडे गावातील जानाई मंदिरात मोठी चोरी झाली या चारही चोरीनमध्ये जवळपास चांदी १६ किलो तर ३ तोळे सोने असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्दे मला चोरीला गेला आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वच मंदिरामध्ये सी सी टीव्ही कँमेरे बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

--पूर्ण---

Web Title: Theft of 6 lakh 30 thousand in Janubai temple at Ambade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.