शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Video: एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:02 IST

गावची रखवाली करणाऱ्या नेपाळी लालबहादूर बिस्टा यांनी चोरट्यांसोबत केलेल्या प्रतिकार आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.

मोरगाव: बारामतीच्या पश्चिम भागात सध्या भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. एक आठवड्यात तब्बल तीन वेळा मोरगाव येथे चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सोमवारी रात्री मंदिर मार्गावर एक सराफी दुकान फोडण्यात आले. गावची रखवाली करणाऱ्या नेपाळी लालबहादूर बिस्टा यांनी चोरट्यांसोबत केलेल्या प्रतिकार आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.        मोरगाव ता बारामती गावातील मध्यवर्ती ठिकाणी घडलेली ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. हे अष्टविनायक स्थान असून येथील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री २.३० वा दरम्यान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तुळजाभवानी ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटरला असलेली कुलपे तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. यावेळी काही चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. लाल रंगाच्या कार गाडीतून चार चाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच चोरट्यांनी सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी रात्रगस्ती घालत असणारा गावातील गुरखा याने सराफी दुकानासमोर जाताना सुरू असलेला दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. 

येथील घटनास्थळावर इतर तीन ते चार मोठी सराफी दुकाने आहेत. गावची रखवाली करणाऱ्या गुरख्याने रात्री धाडस करून या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी चोरट्यांची संख्या पाच आणि प्रतिकार करणारा एक यामुळे हा संघर्ष प्रतिकार कमी पडला. तरीही प्रसंगावधान राखून जिद्द व चिकाटी सह धाडस दाखवून रखवालदाराचा प्रयत्न हा कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी आज बोलताना सांगितले. चोरांनी यावेळी रखवालदाराच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यातून तो बचावला.       मोरगाव येथे घडलेल्या मोठ्या गंभीर घटना प्रकाराची दुपारपर्यंत सुपा किंवा मोरगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल झालेले नाही. सराफी व्यावसायिक कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळा-टाळ करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळावर चार ते पाच मोठ मोठी सोन्या-चांदीचे दुकाने आहेत. तक्रार देण्यासाठी संबंधित व्यावसायिक कोणत्या कारणामुळे टाळाटाळ करीत होता हे मात्र समजू शकले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Morgaon: Jewelry store broken into; theft attempt caught on CCTV.

Web Summary : Thieves targeted a jewelry store in Morgaon for the third time in a week. A brave watchman foiled a robbery attempt, preventing a major loss. The incident, captured on CCTV, has heightened security concerns in the area. Police investigation is ongoing.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही