शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:55 IST

चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ओव्हरफ्लाे झाली आहेत. यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची व ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात प्रथम १२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले हाेते. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरण साखळी मधील टेमघर धरण १६ ऑगस्टला ९५ टक्के भरले आहे. या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.९७ टीएमसी अर्थात ९९.३७ टक्के झाला आहे.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात टेमघर धरण परिसरात २५ मिमी, वरसगाव १६, पानशेत १७, तर खडकवासला धरण क्षेत्रात १ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. चारही धरणे जवळपास १०० टक्के भरल्याने खडकवासला धरणातून ४,७०८ तर पानशेत धरणातून १,९५४ क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा

जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शहरात पाणीकपात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर जुलैत चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे १४ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. त्यानंतर ऑगस्टमध्ये ही दमदार पाऊस झाल्याने पानशेत व वरसगाव ही धरणे तुडुंब भरली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली. आता टेमघर धरणही भरत आल्याने चारही धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणे पूर्ण भरल्याने ग्रामीण भागाच्या शेतीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षी चारही धरणांमध्ये एकूण २७.९५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. यंदा त्यापेक्षा एक टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. - योगेश भंडलकर, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसDamधरण