शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
3
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
4
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
5
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
6
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
7
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
8
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
9
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
10
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
11
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
12
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
13
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
14
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
15
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
16
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
17
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
19
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
20
IND vs PAK सामना अन् YouTuber चा जीव गेला; एक प्रश्न आणि थेट गोळीबार

मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरसोडी - कुगावच्या पुलाचे काम लवकरच सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 9:39 PM

तब्बल  ३८२ कोटी रुपयांचे निघाले टेंडर.

 इंदापूर  : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा यांचा पाठपुरावा, आ. दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्न व त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चढवलेला कळस यामुळे शिरसोडी - कुगाव पुलाच्या कामासाठी ३८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.   

या पुलामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा भाग जोडला जाणार आहे.पुणे व सोलापूर हे जिल्हे जोडले जावून दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. सर्वात कमी वेळात झालेला हा निर्णय इंदापूर तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. हा पूल व्हावा ही इंदापूरमधील सर्व व्यापा-यांची इच्छा होती. त्यामुळे शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा व कार्यकारिणी सदस्य सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते. खा. सुप्रिया सुळे यांनी देखील व्यापा-यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला होता. आ. भरणे व अजित पवार यांच्या भेटीत ही त्यांनी ही मागणी मांडली होती. शहराच्या दळणळणाची गरज लक्षात घेवून अजित पवार यांनी मागील महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात पुलाचे काम करण्याची जाहीर हमी दिली. त्यानुसार हालचाली होवून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग ६५ वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक टेंभुर्णीमार्गे केली जाते. नियोजित पुलावरुनच यातील बहुतांश वाहतूक होणार आहे.त्यामुळे केवळ दोन जिल्हे किंवा तालुके जोडले जाणार नाहीत तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडण्याचे काम झाले आहे. मात्र हा पूल राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर उभारला जाणे आवश्यक आहे. कारण येथून खूप मोठे दळणवळण होणार आहे.   

मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असणार आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील तब्बल १०० किलोमीटरचे अंतर या पुलामुळे कमी होणार आहे. इंदापूर शहराची उलाढाल किमान पाचपटीने वाढणार आहे. करमाळा व इतर भागातील उसाला पश्चिम भागात मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.  उजनी पाणलोट क्षेत्रातही इंदापूर, भिगवण,करमाळा हा पर्यटकांसाठी पाणीदार हिरवा त्रिकोण तयार होणार आहे.   

या पुलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटा सुकर होतील. ग्रामीण भागातील लोकांना सहजतेने आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. मच्छीमारांना इंदापूर व भिगवण या नाणावलेल्या माशांच्या बाजारपेठा काबीज करता येतील. करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील, असे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :Puneपुणे