Video: मोदींनी उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:21 IST2022-03-07T17:10:18+5:302022-03-07T17:21:48+5:30

भाजपच्या कामाची तातडीने चौकशी व्हावी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

The work of Meghadambari of the statue of Shivaraya inaugurated by narendra modi is of inferior quality | Video: मोदींनी उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे

Video: मोदींनी उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे

पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले असून यामुळे महापालिकेच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, "मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपानेछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले. परंतु श्रीपाद छिंदम असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपाचा शिवरायांबाबतचा आकस सातत्याने दिसून आला असून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला आहे."

केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण... 

 "भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे." केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही असेही ते म्हणाले.'' 

Web Title: The work of Meghadambari of the statue of Shivaraya inaugurated by narendra modi is of inferior quality