शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

माणुसकीचे दर्शन! गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 19:25 IST

‘खाकी'त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं....

- कल्याणराव आवताडे धायरी (पुणे):  कडक शिस्त, भारदस्त आवाज,रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकी'त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील ' माणुसकी ' असते हे पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौक परिसरात गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी असलेले उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांचे कार्य पाहून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

वारजे भागातील गोकुळ नगर परिसरात वसंत साठे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. घरासमोर मोकळे पटांगण आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोकळ्या पटांगणत असणाऱ्या गवतामधून चालताना त्यांचा १३ वर्षीय मुलगा आर्यन याच्या अंगठ्याला सापाने चावा घेतला.

सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला दुचाकीवर बसवून खंडोजी बाबा चौकापर्यंत आणले. मात्र त्यांना गर्दीतून पुढे जाता येईना, शिवाय काही रस्तेही वाहतुकीसाठी बंद होते. त्यामुळे तिथे बंदोबस्तासाठी असणारे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे, पोलीस कर्मचारी संदीप सांगळे व कोथरूड वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी समीर बागशिराज यांना वसंत साठे यांनी मदतीसाठी विनंती केली. सर्पदंश झालेला आर्यन बेशुद्ध अवस्थेत चालल्याचे लक्षात आल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांना आर्यनला तत्काळ पोलिस वाहनातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सांगितले.

पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांनी गर्दीतून सायरन वाजवत वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावरील बॅरिकेट काढत पोलीस वाहनातून आर्यनला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वसंत साठे यांनी पोलिसांचे आभार मानले. सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDhayariधायरीPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सव