तरुणाला मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 21, 2023 18:04 IST2023-08-21T18:04:05+5:302023-08-21T18:04:22+5:30
अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो तरुणाच्या क्षेत्रातील लोकांना व्हाट्सअपवर पाठवला

तरुणाला मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे : बदनामी करत असल्याच्या गैरसमजातून तरुणाला अर्धनग्न करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रविवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल व्यवहारे, शिवंकर कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांना फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटल्यानुसार, हा प्रकार १४ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला. फिर्यादी हा आपली बदनामी करतो आहे असे राहुल व्यवहारे आणि शिवणकर कडू यांना वाटले. म्हणून आरोपींनी फिर्यादीला अर्धनग्न करून मारहाण केली. तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना व्हाट्सअपवर पाठवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिघावकर करत आहेत.