शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे... भररस्त्यात मांडव टाकून नाचवल्या बारबाला, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:17 IST

कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे

पुणे - राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलींमुळे या उत्सवात मिरवणूक काढण्यास सरकारने बंदी घातली होती. तसेच, अनेक ठिकाणी गर्दी न जमा होण्यासाठीही आदेश देण्यात आले होते. एकीकडे मिरवणुकांना बंदी असताना दुसरीकडे लग्नाच्या वरातीत चक्क फुटपाथवर बारबाला नाचविल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे. आता, मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना हद्दपार झाल्याच्या अविर्भावात अनेकजण दिसून येतात. विविध कार्यक्रमात, किंवा लग्नसमारंभात माणसांची गर्दी होईल, अशा गोष्टी घडवून आणतात. नुकतेच, पुण्यातील एका लग्नसमारंभात चक्क बारबाला नाचविण्यात आल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. 

पुण्यातील सेनापती बापट रोड, वडारवाडी याठिकाणी एका लग्नाच्या मांडवामध्ये चक्क बारबाला नाचवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये, काही तृथीयपंथी असल्याचंही समजतंय. ट्विटरवर एका युवकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मांडवात कुणीही मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही. अशा नंगानाचचा हा कसा प्रकार, ऐन रस्त्यात रात्री 11.15 वाजता कोरोना नियम धाब्यावर बसवून अशी नाचगाणी सुरू असल्याचं या ट्विटवरील युवकाने म्हटले आहे.  विशेष म्हणजे पुणेपोलिस अशा कार्यक्रमांना परवानगी देणार आहेत का? किंवा दिली आहे का? असा सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस