शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही

By राजू इनामदार | Updated: December 21, 2023 18:10 IST

टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते

पुणे: टिंबर मार्केटमध्ये २५ मे २०२३ च्या रात्री लागलेल्या आगीत बाधीत कुटुंबे व व्यावसायिकांना सरकारकडून वारेमाप आश्वासने मिळाली, मदत मात्र एका पैशाचीही अद्याप मिळालेले नाही. त्या नैसर्गिक आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते आहे.

भवानी पेठेतील टिंबर मार्केट ( लाकूड बाजार) मध्ये वारंवार आग लागत असते. या मार्केटला लागूनच रहिवासी घरे आहेत. हा सर्व परिसर बराच जुना आहे. २५ मे ला अशीच आग लागली. त्यामध्ये ७ दुकानदार व १२ कुटुंबांच्या घराचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाले. अशी आग लागल्यानंतर लगेचच तिथे अधिकारी, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू होतात, सांत्वन केले जाते व मुख्य म्हणजे बरीच आश्वासने दिली जातात.या आगीनंतरही तेच झाले असे तेथील एक बाधित चेतन अगरवाल यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बऱ्याच राजकीय व्यक्तींनी भेट दिली. जिल्हाधिकारीही आले. तिथेच बाधितांना त्वरीत मदत करण्याचा निर्णय झाला. अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत करण्याचा कायदा आहे. त्यानंतर पंचनामा वगैरे करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते व त्याप्रमाणे मंत्रीमंडळाकडे प्रस्ताव पाठवून मंजूरी घेत आर्थिक मदत केली जाते.

या आगीत तहसील स्तरावर पंचनामे झाले आहेत. भेटीदरम्यान मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्वरीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ६ महिने होत आले तरीही सरकारदरबारी यावर काहीच हालचाल नाही. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे सर्व बाधित संतापले असून आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूनच मागणी करण्यात येईल असे अगरवाल यांनी सांगितले ती वेळ येऊ द्यायचे नसेल तर तातडीने मदत केली जावी अशी बाधितांची मागणी असल्याचे अगरवाल म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेfireआगWaterपाणीSocialसामाजिकGovernmentसरकार