शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकानेच छाती, मांडीला स्पर्श करत विद्यार्थिनीशी केले अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:27 IST

कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकानेच अनेक अल्पवयीन मुलींची लैंगिक छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पुणे: महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकानेच अनेक अल्पवयीन मुलींची लैंगिक छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी मोहंमद कय्युम अन्सारी (वय १८, रा. कोंढवा खुर्द) या शिक्षकाला अटक केली आहे. ही घटना २९ जून ते ५ जुलैदरम्यान महात्मा फुले पेठेतील एका शाळेत घडली आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, महापालिकेच्या एका शाळेत मोहंमद अन्सारी याला कंत्राटी पद्धतीने पीटी क्लास घेण्यासाठी नेमण्यात आले होते. शाळेतील १२ ते १६ वर्षाच्या मुलींना पीटी शिकवताना वाईट हेतूने तो खांद्यावर, छातीवर, मांडीवर स्पर्श करीत असे. अश्लील भाषा वापरून, घाणेरड्या नजरेने पाहून मुलींची वेळोवेळी लैंगिक छळवणूक करत असे.

कोणाकडे तक्रार करायची तर करा; मी कोणाला घाबरत नाही, अशी मुलींना धमकीही देत असे. या मुलींनी मुख्याध्यापकांकडे त्याची तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेऊन त्यांनी तातडीने खडक पोलिसांकडे धाव घेतली. खडक पोलिसांनी त्याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसSchoolशाळा