शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानव यांना मारण्यासाठी जाणारा संशयित पुणे रेल्वे स्टेशनवरून ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 09:15 IST

पिस्तूल, ६ काडतुसांसह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

पुणे : संशयास्पद प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनीपुणे रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, ६ काडतुसे यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना मारण्यासाठी तो जात हाेता, असा संशय आहे.

अनिलकुमार रामयग्य उपाध्याय (वय ४७, रा. सुरत, गुजरात) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार निशिकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, धीरेंद्र महाराज हे बुवाबाजी करून अंधश्रद्धा पसरत असल्याचे तसेच त्यांनी ते सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान श्याम मानव यांनी दिले होते. गेल्या ८ दिवसांपासून नागपूरमध्ये वाद सुरू आहे. श्याम मानव यांनी तशी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. त्यामुळे त्यांना धमक्याही आल्या होत्या.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून संशयास्पदरीत्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या कोटाच्या खिशात मेड इन इंग्लंडचे एक पिस्तूल व ६ काडतुसे आढळली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी, त्यात सूर्याचे आकाराचे व सूर्याचे चित्र असलेले पेंडल सापडले. ब्रेसलेट, लॅपटॉप असा ३ लाख ५५ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. आपण कपड्याचे व्यापारी असल्याचा त्याने दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे. तो नागपूरला जात होता. श्याम मानव यांना ज्या धमक्या आल्या, त्याबाबत लोहमार्ग पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. दरम्यान, याबाबत लोहमार्ग पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करता, त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक