शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचे विचित्र धाडस; पुणे विद्यापीठात अश्लील शिव्यांसह रॅपचे चित्रिकरण, पोलिसांची कारवाई

By प्रशांत बिडवे | Updated: April 14, 2023 16:56 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात अश्लील शिव्या देत विनापरवानगी ‘रॅप’ गाण्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच  मुख्य इमारतीमधील सभागृहात अश्लील शिव्या देत विनापरवानगी ‘रॅप’ गाण्याचे चित्रीकरण केल्याचा प्रकार  उघडकीस आला हाेता. याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने पाेलिसांत तक्रार दाखल करताच चतु:श्रृंगी पोलिसांनी शुक्रवारी चित्रीकरणात सहभागी असलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. 

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सहायक सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास करीत याप्रकरणात सहभागी तरूणांचा शाेध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, पोलिसांनी विद्यापीठातील वसतिगृहातून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच इतर साथीदारांचा शाेध घेतला जात आहे. 

विद्यापीठ परिसरात तसेच मुख्य इमारतीच्या सभागृहात अश्लील शिव्या देत रॅप गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. ती चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली हाेती. त्याविराेधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. तसेच याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. गाण्यात अश्लील शिव्यांचा भडीमारासह तलवार, पिस्तूल घेतल्याचे दाखविले आहे. तसेच ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या सभागृहातील टेबलवर मद्याची बाटली, ग्लास ठेवून त्याचेही चित्रिकरण केले आहे. विद्यापीठाच्या या पवित्र वास्तूमध्ये याप्रकारे गाणे चित्रीकरण करण्यास परवानगी कशी दिली जाते असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला हाेता. दरम्यान, विद्यापीठाची परवानगी न घेता या रॅप गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.   

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठCrime Newsगुन्हेगारीmusicसंगीतPoliceपोलिसEducationशिक्षण