VIDEO| शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन; शिवसैनिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:23 IST2022-07-19T19:17:00+5:302022-07-19T19:23:02+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे शिवसैनिकांकडून निषेध...

VIDEO| शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन; शिवसैनिक आक्रमक
राजगुरुनगर (पुणे): शिवसेनेचे उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांचा पुतळा चपलांचा हार घालून जाळला.
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आढळराव पाटील हे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. आढळराव हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे राजगुरुनगर येथे तीव्र निषेध करण्यात आला.
निषेध करताना आढळराव यांचा पुतळ्याची गाढवावर बसून मिरवणुक काढून पुतळ्याचे पुणे -नाशिक महामार्गावर दहन केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा समनव्यक अँड. गणेश सांडभोर,माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, अमोल विरकर, तुषार सांडभोर,कुमार ताजवे, शांताराम चौधरी, अविनाश मुळुक, निलेश वाघमारे, चंद्रकांत भोर, महेंद्र घोलप, बबनराव दौंडकर, सचिन पडवळ, बाजीराव बुचुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांच्या पुतळ्याला चपलांचा हार; शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप#shivsena#punepic.twitter.com/Ktr5OrmUvr
— Lokmat (@lokmat) July 19, 2022