शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:40 IST

- विमानतळाचा भास देणाऱ्या बारामतीच्या एसटी बसस्थानकाची सुरक्षा ‘रामभरोसे’

बारामती : विमानतळाचा भास देणारे बारामती शहरात उभारलेल्या नूतन बसस्थानकाची सुरक्षा सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. २७) दुपारी ३:४५च्या सुमारास केलेल्या पाहणीत हे धक्कादायक चित्र दिसून आले. बसस्थानकाची खासगी सुरक्षा व्यवस्थेसह पोलिस सुरक्षा व्यवस्थादेखील वाऱ्यावर सोडून दिल्याचे पाहणीत आढळून आले.बारामती एसटी बसस्थानकात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांची संख्या मोठी आहे. बारामती आगाराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसस्थानकातून प्रतिदिन ३० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, तुलनेने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. जुन्या बसस्थानकात पोलिस मदत केंद्र मध्यवर्ती ठिकाणी सर्वांना दृष्टीस पडेल असे होते. त्यामुळे पोलिसांचा भुरट्या चोरांवर, येथे वावरणाऱ्या गुन्हेगारांवर वचक होता. मात्र, नवीन बसस्थानकात पोलिस मदत केंद्र एका खोलीत आहे. या खोलीत पोलिसांना बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकात घडणाऱ्या घडामोडी पोलिसांना समजत नाहीत. पोलिसांकडे एखादा प्रवासी तक्रार घेऊन गेल्यानंतरच या ठिकाणी घडलेल्या प्रकाराला वाचा फुटते. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पोलिस मदत केंद्रात एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. या ठिकाणी इतरांंनीच ठाण मांडल्याचे दिसून आले. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार येथे स्वतंत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. यामध्ये महिला पोलिसांचीदेखील गरज आहे.

शिवाय बसस्थानकात प्रवेशद्वारावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांची केबिनदेखील कुलूप बंद होती. या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचे दिसून आले. बसस्थानकात काही महिला प्रवाशांच्या दागिने लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत बसस्थानकात वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. मात्र, चोरी करणाऱ्या चोरांपर्यंत पोहोचून हे प्रकार बंद करून एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. बसस्थानकात पार्किंग सोडून इतरत्र चारचाकी, दुचाकी वाहनांचे अतिक्रमण दिसून आले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवासी सुरक्षितता ‘जैसे थे’ आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.एसटी फलाटावर वाहने पार्किंगप्रवेशद्वारातच रस्त्यालगत वाहने लावून त्यावर गप्पा मारत बसणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांवर आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे यातून गंभीर अपघात होण्याची भीती नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे. एसटी फलाटावर वाहने पार्किंग करण्याचा प्रताप काही प्रवाशांकडून घडत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. तर काही एसटी बस लावण्याच्या ठिकाणी दुचाकी बिनधास्तपणे लावतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. फलाटावर, बसस्थानकाच्या आवारात मनमानी अतिक्रमण करणाऱ्या प्रवाशांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे गंभीर अपघातांना कारणीभूत ठरण्याची भीती असणाऱ्या वाहनचालकांना आवरणार कोण, हा प्रश्न निरुत्तरीतच आहे. एसटी बसस्थानकाच्या आवारात ‘नो-पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकाकडे दुर्लक्ष करून खुलेआम कोणत्याही ठिकाणी मनमानी पद्धतीने वाहने लावली जातात. त्यामुळे नो-पार्किंगचा फलक नामधारी ठरला आहे. याच फलकासमोर अस्ताव्यस्त वाहने लावली जातात.  

४५ सीसीटीव्ही

बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचा दावा खोडून काढला आहे. सुरक्षा रक्षक ‘राऊंड’ला गेल्यामुळे सुरक्षा रक्षक त्यावेळी अनुपस्थित होते. दरवाजाचा प्राॅब्लेम असल्यामुळे केबिन बंद असल्याचा दावा घोगरे यांनी केला आहे. बसस्थानकात एकूण ११ सुरक्षा रक्षक आहेत. रात्री बसस्थानकात ४ सुरक्षा रक्षकांची नेमणूक असते. बारामतीची शेवटची बस रात्री ९:४५ला असते. त्यानंतर रात्री उशिरा बारामतीत एकूण ७ एसटी बस येतात. यावेळी सुरक्षा रक्षक असतात. शिवाय संपूर्ण आगाराच्या आवारात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४५ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असे घोगरे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीWomenमहिला